Nexon अन् Creta लाही वरचड ठरली ही कार; मायलेजमध्ये आहे सगळ्यांची 'बाप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:05 IST2025-06-11T14:57:27+5:302025-06-11T15:05:40+5:30

Best Selling Car: विक्रीच्या बाबतीत या कारने Nexon, Creta, Scorpio अन् Punch लाही मागे टाकले आहे.

Best Selling Car: भारतीय बाजारपेठेत Maruti Suzuki च्या गाड्यांना खूप मागणी असते, त्यामुळेच भारतात या कंपनीच्या सर्वाधिक गाड्या विकल्या जातात. दरम्यान, गेल्या महिन्यात विकल्या गेलेल्या टॉप १० कारची यादी समोर आली आहे. या यादीत मारुती सुझुकीनेच पहिले स्थान पटकावले आहे. विक्रीच्या बाबतीत Maruti Suzuki च्या एका गाडीने Hyundai Creta, Mahindra Scorpio आणि Tata Nexon सारख्या लोकप्रिय गाड्यांनाही मागे टाकले आहे.

या कार टॉप ५ मध्ये आहेत- तुम्हाला हे जाणून थोडे आश्चर्य वाटेल की, टॉप १० पैकी ७ कार मारुती सुझुकीच्या आहेत. Maruti Suzuki Dzire पहिल्या क्रमांकावर आहे. मे महिन्यात या कारच्या १८,०८४ युनिट्स विकल्या गेल्या. मायलेजच्या बाबतीतही ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कंपनीच्या मते, ही कार पेट्रोलवर (मॅन्युअल) २४.७९ किमी आणि पेट्रोलवर (ऑटोमॅटिक) २५.७१ किमीचा उत्तम मायलेज देते.

दुसऱ्या नंबरवर Maruti Suzuki Ertiga आहे. मे महिन्यात कंपनीने या गाडीचे १६,१४० युनिट्सची विक्री केली. तसेच, १५,५६६ युनिट्स विक्रीसह Maruti Suzuki Brezza तिसऱ्या नंबरवर आहे.

Hyundai Creta आणि या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन, दोन्ही ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. कंपनीने मे महिन्यात या एसयूव्हीच्या १४,८६० युनिट्स विकल्या आहेत. महिंद्रा स्कोप्रियो पाचव्या क्रमांकावर असून, या कारच्या एन व्हेरिएंटचे १४,४०१ युनिट्स विकल्या आहेत.

हॅचबॅक सेगमेंटमध्येही मारुती दबदबा- मारुती सुझुकीची लोकप्रिय हॅचबॅक Swift च्या गेल्या महिन्यात १४,१३५ युनिट्सची विक्री झाली होती. याशिवाय, १३,९४९ युनिट्स विक्रीसह WagonR सातव्या नंबरवर होती.

एसयूव्हीबद्दल बोलायचे झाले तर, Fronx लाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. गेल्या महिन्यात या कारच्या एकूण १३,५८४ युनिट्स, Tata Punch च्या १३,१३३ युनिट्स आणि या कारच्या इलेक्ट्रिक व्हर्जनची एकूण १३,०९६ युनिट्स विकली गेली.