शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Automatic vs Manual Transmission: ऑटोमॅटिक की गियर असलेली कार? अशा प्रकारे करा तुमच्या कारची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 2:53 PM

1 / 15
आपली स्वत:ची कार असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु कार घेताना प्रत्येकाच्या मनात काही ना काही प्रश्न असतात.
2 / 15
कार घेताना तिची किंमत काय असेल? आपण ऑटोमॅटिक कार घ्यावी की मॅन्युअल म्हणजेच गिअर असलेली कार घ्यावी हा प्रश्नही अनेकांच्या मनात असतो.
3 / 15
आज बहुतांश लोकांकडे आपली स्वत:ची कारही असेल. परंतु सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ऑटोमॅटिक गाड्यांच्या पर्यायासमोर आपण मॅन्युअल म्हणजेच गिअरवाली कार घ्यावी का असा विचार लोकं करताना दिसतात.
4 / 15
सुविधेनुसार पाहायला गेलं तर ऑटोमॅटिक कार या मॅन्युअल कार्सच्या तुनेत मेटेंनन्स खर्च वगैरेच्या तुलनेत मॅन्युअल ट्रान्समिशन कारपेक्षा उत्तम असल्याचं म्हटलं जातं. परंतु आपण यातील काही सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टीही पाहू.
5 / 15
सुविधेच्या दृष्टीनं ऑटोमॅटिक कार हा उत्तम पर्याय आहे. सुरुवातीला कार शिकण्यासाठीही हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
6 / 15
या कारमध्ये केवळ पायाकडे ब्रेक आणि अॅक्सिलेटर असतं. त्यामुळे क्लच आणि गिअरसारख्या अन्य बाबींकडे लक्ष द्यावं लागत नाही.
7 / 15
ऑटोमॅटिक कारमधील मशीनमध्ये काही गडबड झाली तर ती रस्त्याच्या मधोमध बंद पडण्याची शक्यता कमी असते.
8 / 15
आजकाल एएमटी, ड्युअल क्लच, सीव्हीटी, आयएमटी आणि टॉर्क कन्व्हर्टरसारख्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसारख्या व्हरायची बाजारात उपलब्ध आहेत.
9 / 15
ऑटोमॅटिक कार चालवण्याची सवय झाल्यास मॅन्युअल ट्रान्समिशन कार चालवण्यास समस्या निर्माण होतात. तसंच ऑटो ट्रान्समिशन बदलणं किंवा त्याला दुरूस्त करणं ही तुलनेनं महाग असतं.
10 / 15
ऑटो कारचं ब्रेकडाऊन झालं तर ती कार धक्का मारून सुरू करता येत नाही. तसंच ती बाजूलाही करता येणार नाही. ऑटो कारच्या किंमती तुलनेनं अधिक असताता. तसंच ऑटो कारमध्ये तुलनेनं इंधनही अधिक लागतं.
11 / 15
मॅन्युअल ट्रान्समिशन कार्सचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. या कार चालवणारे चालक ऑटो कार्स सहजरित्या चालवू शकतात.
12 / 15
गिअर्स काम करत नसतील तर आपात्कालिन परिस्थितीमध्ये तुम्हाला कार थांबवता येऊ शकते. त्यांची दुरूस्ती करणंही सहज शक्य असतं आणि या कार ऑटो कारच्या तुलनेनं कमी महागड्या असतात.
13 / 15
या कारची किंमत ऑटो कारच्या तुलनेनं कमी आणि गाड्यांचं मायलेजही तुलनेनं जास्त असतं.
14 / 15
क्लच पॅडलमुळे वाहनांची रांग लागलेली असताना ट्रॅफिक असताना या कार चालवणं त्रासदायक ठरतं. क्लच प्लेट्स बाहेर आल्या तर याचा मायलेजवरही परिणाम होतो.
15 / 15
जर तुम्ही मॅन्युअल ट्रान्समिशन कार शिकत असाल तर चढण असलेल्या रस्त्यांवरही सातत्यानं गिअर बदलणं किंवा त्याचा अंदाज येणं सुरुवातीला थोडं कठीण जातं.
टॅग्स :carकारAutomobileवाहन