Auto Expo 2020: सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Mahindra eKUV100 लाँच; जाणून घ्या फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 22:11 IST2020-02-05T22:07:15+5:302020-02-05T22:11:06+5:30

Auto Expo 2020च्या पहिल्याच दिवशी अनेक कंपन्यांच्या गाड्यांचं अनावरण करण्यात आलं आहे. देशातली एसयूव्ही निर्माता कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रानं बुधवारी इलेक्ट्रिक कार eKUV100 सादर केली आहे.
तत्पूर्वी ऑटो एक्स्पो 2018मध्ये या कारची झलक दाखवण्यात आली होती. Mahindra eKUV100 ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीनं या गाडीची एक्स- शोरूमची किंमत 8.25 लाख रुपये ठेवली आहे.
आतापर्यंत आलेल्या इलेक्ट्रिक कारमध्ये eKUV100 ही सर्वात स्वस्त आहे. महिंद्राच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये 40kWची इलेक्ट्रिक मोटार देण्यात आली आहे, जी 54.4 एचपी पॉवर आणि 120 एनएम टॉर्क निर्माण करते.
यात लिक्विड कूल्ड बॅटरी बसवण्यात आली आहे. एका चार्ज केल्यानंतर ही गाडी 150 किलोमीटरचं अंतर कापते. कंपनीनं या कारमध्ये जलदरीत्या चार्जिंग होण्याची सुविधा दिली असून, ती 60 मिनिटांत 80 टक्के चार्ज होणार आहे.
स्टँडर्ड चार्जरद्वारे पूर्णतः चार्ज होण्यासाठी 5.45 तासांचा अवधी लागतो. या कारची बुकिंग मार्चमध्ये सुरू झाली आहे. तसेच डिलिव्हरी एप्रिलपर्यंत मिळणार आहे. कंपनीनं KUV100 NXT तुलनेत कारमध्ये काही बदल केलेले आहेत. या गाडीच्या हेडलॅप्स आणि टेललाइट्समध्ये बदल करण्यात आला आहे.