अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 19:33 IST2020-01-09T19:31:59+5:302020-01-09T19:33:09+5:30
अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
गंगाखेड: दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ( दि. ८ ) रात्री ९ वाजेच्या सुमारास सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टे. रस्त्यावर घडली. कृष्णा साखरे असे मृत तरुणाचे नाव असून तो जेसीबी मशीन ऑपरेटर म्हणून काम करत असे.
या बाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड परळी रस्त्यावर शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगाव स्टेशन येथील रेल्वे फाटकावर अंडरग्राउंड रेल्वे ब्रीजचे काम सुरु आहे. या ठिकाणी जेसीबी मशीन ऑपरेटर म्हणून कृष्णा साखरे ( २२ वर्षे रा. साखरेवाडी ता. मानवत ) काम करत असे. बुधवारी रात्री कृष्णा दुचाकीवरून ( क्रमांक एम एच २३ ए एच १३१० ) प्रवास करत असताना वडगाव स्टेशन पाटीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
याची माहिती बालाजी फड, सुखदेव कांदे, अशोक सातपुते, बाळासाहेब मुंडे, जनार्दन आंधळे, संतोष मुंडे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर सपोनि विकास कोकाटे, पोलिस जमादार त्र्यंबकराव शिंदे, कृष्णा तंबूड आदी कर्मचाऱ्यांनी तरुणाचा मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.