भाच्चीच्या लग्न समारंभावरून परणाऱ्या तरुणाचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 12:51 IST2020-02-05T12:49:52+5:302020-02-05T12:51:58+5:30

कृष्णा विठ्ठल कुरूडे असे मृत तरुणाचे नाव आहे.

youngster dies in motorcycle accident at Selu | भाच्चीच्या लग्न समारंभावरून परणाऱ्या तरुणाचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू

भाच्चीच्या लग्न समारंभावरून परणाऱ्या तरुणाचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू

ठळक मुद्देपरतूर येथून लग्न समारंभ आटोपून येत होता तरुण

सेलू : सेलू ते सातोना रस्त्यावर दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. कृष्णा विठ्ठल कुरूडे असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा विठ्ठल कुरूडे (१८, रा. समता नगर, सेलू ) हा तरूण वरफळ ( ता. परतूर जि. जालना ) येथून एक लग्न समारंभ आटोपून मंगळवारी रात्री सेलू कडे एम एच२२ ए एस ७९९३या दुचाकीवरून येत होता. सेलू ते सातोना रस्त्यावरील खडी मशीनजवळ दुचाकीला अपघात होऊन तरूण जागीच ठार झाला. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगांवकर पोलीस कर्मचारी संजय साळवे आप्पाराव वराडे ,राहूल मोरे यांच्या सह मयत तरुणाचे नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच तरूणाचा  मृत्यु  झाला. याप्रकरणी सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: youngster dies in motorcycle accident at Selu