कपडे धुण्यासाठी गेलेल्या युवतीचा कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 18:11 IST2021-04-06T18:10:52+5:302021-04-06T18:11:12+5:30
पाथरी तालुक्यातील वरखेड येथील घटना

कपडे धुण्यासाठी गेलेल्या युवतीचा कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू
पाथरी : जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर सोमवारी कपडे धुण्यासाठी गेलेली युवती पाय घसरून पाण्यात बुडाली होती . आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे .
जायकवाडीच्या डाव्या कालव्यात सध्या उन्हाळी हंगामात पिकासाठी पाणी सोडण्यात आलेले आहे. तालुक्यातील वरखेड गावाच्या जवळून डावा कालवा गेलेला आहे. गावातील महिला कॅनलला कपडे धुण्यासाठी जातात. सोमवार 5 एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ऋतिका अश्विन मकासरे (19, रा. सर्वोदय नगर सेलू हल्ली मुक्काम वरखेड ) ही कपडे धुण्यासाठी साठी गेली होती. यावेळी तिचा पाय घसरून ऋतिका वाहत्या पाण्यात पडली. यातच तिचा बुडून मृत्यू झाला आहे.
आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह किन्होळा खु. शिवारात आढळून आला. याप्रकरणी नाथा राणू भुजबळ राहणार वरखेड यांच्या माहितीवरून आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे .घटनास्थळी पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण व उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी भेट दिली आहे .पुढील तपास पाथरी पोलिस करत आहेत .