शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घडेल समाज उभारणीचे कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:13 IST

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या २०२०-२१ या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठ स्थापनेपासूनच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात ...

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या २०२०-२१ या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठ स्थापनेपासूनच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. ढवण बोलत होते. कार्यक्रमास विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर, मनपा आयुक्त देवीदास पवार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक शिवराम खेडुळकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ. धीरज कदम, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य भगवान आसेवार, प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्राचार्य डॉ. जया बंगाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी सर्वप्रथम सदस्य नोंदणी केली. अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर म्हणाले, प्रशासकीय पदावर काम करीत असताना शेतकरी बांधवांसाठी काम करण्याची संधी या विद्यापीठाने दिली. विद्यापीठातील काही जमीन कृषी उद्योजकांना फुट पार्क उभारणीकरिता दिल्यास शेतकरी व कृषी उद्योजकांचा फायदा होऊ शकेल. विद्यापीठ राबवित असलेल्या हरित विद्यापीठ उपक्रमासही अनेकांचे मदतीचे हात पुढे येत आहेत. या उपक्रमाप्रमाणेच इतर अनेक चांगले उपक्रम राबविण्यासाठी माजी विद्यार्थी पुढे येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ. धर्मराज गोखले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रणजीत चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुरेश वाईकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.