जिंतूरात ऑटो उलटून एक महिला ठार; दोन प्रवासी जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 16:17 IST2019-01-25T16:16:23+5:302019-01-25T16:17:46+5:30

अवैध प्रवासी वाहतूक करणारा एक ऑटोरिक्षा उलटून महिला ठार तर दोघे जण जखमी झाले.

A woman dies in auto-rickshaw accident; Two passengers injured | जिंतूरात ऑटो उलटून एक महिला ठार; दोन प्रवासी जखमी 

जिंतूरात ऑटो उलटून एक महिला ठार; दोन प्रवासी जखमी 

जिंतूर (परभणी ) : अवैध प्रवासी वाहतूक करणारा एक ऑटोरिक्षा उलटून महिला ठार तर दोघे जण जखमी झाले. ही घटना आज दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान माणकेश्वर शिवारात घडली. 

अगलगाव येथून धान्य व प्रवासी घेऊन एक ऑटोरिक्षा (क्रमांक एम एच 22 व्ही 1078) माणकेश्वरकडे येत होता. माणकेश्वरजवळ येताच रिक्षाचा रॉड तुटल्याने तो उलटला. यात द्वारकाबाई शंकर जाधव (रा. अगलगाव 58 ) या जागीच ठार झाल्या. तर रुद्राक्ष संतोष जाधव (6), अर्जुन बबन पवार (50) हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले आहे.

Web Title: A woman dies in auto-rickshaw accident; Two passengers injured