शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

६० हजार हेक्टरवरील पिकांसाठी सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST

येलदरी धरणात यावर्षी १०० टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्ह्यातील ...

येलदरी धरणात यावर्षी १०० टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्ह्यातील पिकांना भविष्यात पाणी सोडले जाईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार येलदरी धरण प्रशासनाकडून पाणी पाळ्याचे नियोजनही करण्यात आले होते. त्यानुसार या धरणातून उन्हाळी हंगामातील भूईमुग, ऊस यासह रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू या पिकांसाठी पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाणी येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात नदीवाटे नेले जात आहे. सिद्धेश्वर धरणातून पूर्णा मुख्य कालवा, हट्टा शाखा कालवा, लासिना शाखा कालवा, वसमत शाखा कालवा व अंतिम शाखा कालवा या५ कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी जलसंपदा विभाग नियोजन केले आहे. या पाच कालव्यामधून परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील ५७ हजार ९८८हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. २३फेब्रुवारी रोजी सोडलेल्या पाण्यामुळे या भागातील शेतीसह तीन जिल्ह्यातील २५० हून अधिक गावांना देखील भर उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. त्याच बरोबर परभणी, हिंगोली, पूर्णा, वसमत व जिंतूर या मोठ्या शहरांचाही समावेश आहे. त्यामुळे या पाण्यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांमधून शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होणार आहे.

१५ मेगावॅट वीज निर्मिती

येलदरी येथील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ५७ हजार ९८८ हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे. त्याच बरोबर आतापर्यंत येलदरी येथील जलविद्युत केंद्राने या पाण्याच्या माध्यमातून १५ मेगावॅट एवढी वीज निर्मिती केली आहे. त्यामुळे शेती सिंचनाबरोबरच वीज निर्मितीही होत आहे.

‘‘ यावर्षी येलदरी धरण १०० टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात झालेल्या नैसर्गिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी मोठी संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोडलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करावा. तसेच ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करुन पाण्याची बचत करावी.

-एस.के.सबनीवार, अधीक्षक अभियंता नांदेड मंडळ