शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
2
कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
3
UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा?
4
पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी
5
इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
6
गुरु गोचर २०२५: १३ ऑक्टोबरचे गुरु भ्रमण अडलेल्या कामांना, विवाहाला, व्यवहाराला देणार सुपरफास्ट गती!
7
टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमात मोठा बदल! एन चंद्रशेखरन करणार हॅट्ट्रिक
8
पाकने २१ अफगाणी चाैक्या बळकावल्या, पाक-अफगाण संघर्षात; ५८ पाकिस्तानी सैनिक ठार
9
Success Story: झोमॅटो डिलिव्हरी बॉयनं 'कार्ट' पासून बनवला ब्रँड, आता वार्षिक ४० लाखांची उलाढाल, लोक विचारताहेत, 'कसं केलं?'
10
Video - टीम जिंकली पण 'तो' हरला, क्रिकेटर मैदानावरच कोसळला, शेवटचा बॉल टाकला अन्...
11
Ambadas Danve : "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी
12
रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार
13
"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
14
मुक्काम पोस्ट महामुंबई : धनुष्यबाण कोणाचा? याचा निकाल भाजपला महाराष्ट्रात नेमके काय हवे आहे, हे सांगणारा असेल
15
मला जाऊ द्या ना दुकानी, आता वाजले की बारा...
16
१००% पैसे होणार डबल! पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये ₹२५,००० ची गुंतवणूक देईल लाखोंचा रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
17
"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय
18
सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार....
19
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
20
मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्याचं हास्यजत्रेशी आहे खास कनेक्शन!

सही, शिक्का देण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्याने घेतली दहा हजार लाच

By राजन मगरुळकर | Updated: June 5, 2024 19:24 IST

परभणी एसीबी पथकाची कारवाई : गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू

परभणी : तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे धनादेश मिळविण्यासाठी आरोपी लोकसेवक ग्रामविकास अधिकाऱ्याने दिलेल्या धनादेशावर धनादेश बँक खात्यात जमा करण्यासाठी आरटीजीएस फॉर्मवर सही व शिक्का देण्यासाठी लाचेची मागणी केली. पडताळणी दरम्यान तडजोडीअंती दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. पंचासमक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान बुधवारी तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपयाची रक्कम लाच म्हणून स्वीकारली. त्यामध्ये आरोपी लोकसेवक यास लाचेचा रकमेसह ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी मानवत ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मधुकर बाबुराव गोरे ग्रामविकास अधिकारी (वर्ग तीन) असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. तक्रारदार यांनी मानवत तालुक्यातील मौजे पोहंडूळ येथे डीपीसीच्या निधीमधून मंजूर झालेल्या रकमेतून तेथील नाले व सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम केले होते. सहा मे रोजी तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे धनादेश मिळविण्यासाठी आरोपी लोकसेवक मधुकर गोरे यांची भेट घेऊन धनादेश घेतला. त्यानंतर सदर धनादेश तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आवश्यक असलेल्या आरटीजीएस फॉर्मवर आरोपी लोकसेवक मधुकर गोरे यांची सही व शिक्का आवश्यक असल्याने सदरची सही व शिक्का देण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांना २० हजार रुपये लाच मागितली.

अखेर एसीबी कार्यालयात तक्रारसदर लाचेची रक्कम न दिल्यास सही व शिक्का देणार नाही, या भीतीने तक्रारदार यांनी त्यांच्याकडे असलेले चार हजार रुपये गोरे यांना तत्काळ दिले. त्यानंतर उर्वरित १६ हजार रुपये सही व शिक्का घ्यायचे वेळी आणून देण्यास सांगितले. सदर रक्कम ही लाच असल्याने व तक्रारदार यांना लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी १३ मे रोजी एसीबी कार्यालयात तक्रार दिली.

अखेर सापळा कारवाईत घेतली रक्कमपंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान १३ मे रोजी तक्रारदार यांना मिळालेल्या धनादेश त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आवश्यक अर्जावर आरोपी लोकसेवक मधुकर गोरे यांनी सही, शिक्का देण्यासाठी तडजोडीअंती दहा हजार रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून बुधवारी पंचासमक्ष केलेल्या सापळा कारवाईमध्ये आरोपी लोकसेवक गोरे यांनी तक्रारदार यांच्याकडून दहा हजार लाच रक्कम स्वीकारली. यानंतर त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी मानवत ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे व पथकाने केली. तपास पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे करीत आहेत.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी