दुर्दैवी! कृषिपंपाचे स्टार्टर दुरुस्त करताना अचानक वीज आली, तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 13:26 IST2023-03-09T13:26:11+5:302023-03-09T13:26:36+5:30
कृषीपंपाचे स्टार्टर नादुरुस्त असल्याने शेतकरी स्वतः ते दुरुस्त करू लागला.

दुर्दैवी! कृषिपंपाचे स्टार्टर दुरुस्त करताना अचानक वीज आली, तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
पाथरी - शेतातीलकृषीपंपाचे स्टार्टर दुरुस्ती करत असताना विजेचा शॉक लागून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू सिमुरगव्हाण येथे आज सकाळी झाला. कृष्णा ओमप्रकाश उगले ( 26) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सिमुरगव्हाण येथील कृष्णा उगले हा शेतकरी सकाळी 10 वाजेच्या सुमारास गावालगतच्या शेतात गेला होता. यावेळी शेतातील कृषीपंप सुरु होत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. कृषीपंपाचे स्टार्टर नादुरुस्त असल्याने कृष्णा स्वतः ते दुरुस्त करू लागला. मात्र, अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने कृष्णाला जोरदार धक्का बसला. यात कृष्णाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, कृष्णाचा मृतदेह पाथरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.
..............