अंजनावाडीजवळ ट्रक व कार अपघात; एकजण ठार तर तिघे जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 16:49 IST2018-07-07T16:49:01+5:302018-07-07T16:49:39+5:30

पालम ते लोहा राज्य रस्त्यावर अंजनावाडीजवळ काल रात्री आठच्या सुमारास ट्रक व कारचा भीषण अपघात झाला.

Truck and car accident near Anjnavadi; One killed and three injured | अंजनावाडीजवळ ट्रक व कार अपघात; एकजण ठार तर तिघे जखमी 

अंजनावाडीजवळ ट्रक व कार अपघात; एकजण ठार तर तिघे जखमी 

परभणी : पालम ते लोहा राज्य रस्त्यावर अंजनावाडीजवळ काल रात्री आठच्या सुमारास ट्रक व कारचा भीषण अपघात झाला. यात  एकजण ठार झाला असून तिघे जखमी आहेत. जखमींवर नांदेड येथे उपचार सुरु आहेत. 

या बाबत अधिक माहिती अशी कि, काल रात्री एक कार लोह्याहुन पालमकडे येत होती. अंजनावाडी जवळ या कारचा आणि ट्रकचा अपघात झाला. यात कारमधील चौघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले. उपचारादरम्यान शेख युनूस शेख खुर्शीद (30) याचा मृत्यू झाला. तर शेख वसीम , महंमद आजू व अन्य एक अशा तिघांवर उपचार सुरु आहेत. मृत शेख यूनूस हा युवक काँग्रेसचा गंगाखेड विधानसभा अध्यक्ष पदावर कार्यरत होता.  
 

Web Title: Truck and car accident near Anjnavadi; One killed and three injured