The tribe was beaten out of the village | जनजागृती पथकाला गावातून पिटाळून लावले
जनजागृती पथकाला गावातून पिटाळून लावले

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत(परभणी) : कर्जमाफीसाठी आंदोलनास बसलेल्या खडकवाडी येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या आक्रमकपणाचा सामना मतदान प्रक्रियेची जनजागृती करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना १८ सप्टेंबर रोजी करावा लागला. या विधानसभा निवडणुकीत मतदान करायचे नाही, असे सांगून कर्मचाºयांच्या पथकाला शेतकºयांनी पिटाळून लावले.
तालुक्यातील खडकवाडी येथील शेतकºयांनी गावातील हनुमान मंदिरात ३१ आॅगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. राज्य शासनाने दीड लाख रुपयांपर्यंत शेतकºयांची कर्जमाफी जाहीर केली आहे; परंतु, ज्या शेतकºयांकडे दीड लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज आहे, अशा शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ होणे अपेक्षित असताना बँक प्रशासनाच्या वतीने विशिष्ट रक्कम भरण्यासाठी सांगितले जात असल्याचा आरोप आंदोलक शेतकºयांनी केला आहे.
खडकवाडी येथील आंदोलकांची लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाºयांनी भेट घेतली. मात्र तोडगा न निघाल्याने १८ सप्टेंबर रोजी म्हणजेच १८ व्या दिवशीही आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन सुरु असतानाच आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ईव्हीएम मशीनवर मतदान कसे करायचे? याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तहसील कार्यालयाचे पथक दुपारी १२ वाजता खडकवाडी गावात दाखल झाले.
पथकातील कर्मचाºयांनी गावातील हानुमान मंदिरासमोर एका टेबलवर ईव्हीएम मशीन ठेऊन ग्रामस्थांना प्रात्याक्षिक दाखविण्यासाठी बोलविण्यात आले. मात्र कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन करणाºया ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत हे प्रात्यक्षिक बंद पाडले. फसव्या कर्जमाफीबाबत सरकारने निर्णय न घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नसल्याचे अधिकाºयांना सांगितले. आंदोलनकर्त्या शेतकºयांचा आक्रमक पवित्रा पाहून तहसील कार्यालयाच्या पथकाने काढता पाय घेतला.
मत मागायला येणाºयांना तुडवा : राजू शेट्टी यांचे आवाहन
४तालुक्यातील खडकवाडी येथे संपूर्ण कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या आंदोलनास्थळी १७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी भेट घेतली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश फोफळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, तालुकाध्यक्ष हनुमान मसलकर उपस्थित होते.
४यावेळी बोलताना गेल्या तीन वर्षापासून हे सरकार शेतकºयांच्या भावनांशी खेळत असून शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. शेतकºयांना बँकेचे निल प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत मतदान मागण्यासाठी येणाºयांना तुडवा, असे वादग्रस्त विधान केले.
तीन गावांत आंदोलन सुरू
४ तालुक्यातील सावळी, जंगमवाडी, नागरजवळा येथील शेतकºयांनी आपापल्या गावातील मारोती मंदिरात धरणे आंदोलन सुरु केले आहे. खडकवाडी येथे सुरु झालेल्या आंदोलनाचा वाणवा आता इतर गावात पसरत आहे.
४लवकरच तालुक्यातील इतर काही गावात देखील धरणे आंदोलन सुरु होणार असल्याचे खडकवाडी येथील आंदोलकांनी सांगितले.

Web Title: The tribe was beaten out of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.