रस्त्यात उभे ट्रॅक्टर ठरले जीवघेणे; ट्रॉलीवर दुचाकी धडकून तरुणाचा जागीच मृत्यू, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 14:57 IST2023-04-15T14:56:08+5:302023-04-15T14:57:04+5:30
मानवत ते मानवतरोडवरील मार्गावर झाला अपघात

रस्त्यात उभे ट्रॅक्टर ठरले जीवघेणे; ट्रॉलीवर दुचाकी धडकून तरुणाचा जागीच मृत्यू, एक जखमी
मानवत: मानवत - मानवतरोड राष्ट्रीय महामार्गावर उभे असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर पाठीमागून दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री 9 वाजता झाला.
तालुक्यातील खरबा येथील रामा देविदास निर्मळ (28) आणि श्रीराम नामदेव निर्मळ (32) हे दोघे दुचाकीवरून ( क्रमांक एम एच 12 पी एम 3969) मानवतकडून आपल्या खरबा गावाकडे निघाले होते. दरम्यान, राधेश्याम जिनींगसमोर महामार्गावर एक ट्रॅक्टर उभे होते. या ट्रॅक्टर ट्रॉलीवर पाठीमागून दुचाकी धडकली. यात दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
यावेळी डॉक्टरांनी तपासून रामा देविदास निर्मळ यास मृत घोषित केले. तर जखमी श्रीराम निर्मळ यास पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे. आज सकाळी शनिवारी सपोनि प्रभाकर कापुरे पोउनि किशोर गावंडे, बळीराम थोरे, सिद्धेश्वर पाळवदे, नारायण सोळंके यांनी भेट देऊन पंचनामा केला. मयत रामा निर्मळ यांच्या पश्चात पत्नी-दोन मुली, वडील असा परिवार आहे.