त्रासाला कंटाळून तरुणीने संपवलं जीवन; मृत्युपूर्व जबाबावरून तिघांविरुद्ध गुन्हा

By ज्ञानेश्वर भाले | Published: June 17, 2023 03:14 PM2023-06-17T15:14:08+5:302023-06-17T15:15:46+5:30

अंगावर पेट्रोल ओतून तरुणीने घेतले होते पेटवून

Tired of suffering, the young woman ended her life; Crime against three on death row | त्रासाला कंटाळून तरुणीने संपवलं जीवन; मृत्युपूर्व जबाबावरून तिघांविरुद्ध गुन्हा

त्रासाला कंटाळून तरुणीने संपवलं जीवन; मृत्युपूर्व जबाबावरून तिघांविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

सोनपेठ (जि.परभणी) : बदनामी करण्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने स्वत: च्या अंगावर पेट्रोल टाकून घेत आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी मयत तरुणीच्या मृत्युपूर्व जबाबावरून तिघांविरुद्ध सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत तरुणीने मृत्यूपूर्व जबाबात म्हटले की, कार्तिक मिरासे यास का बोलत नाहीस, नाहीतर आम्ही तुझी गावातील लोकांना बोलतेस म्हणून बदनामी करतो, असे म्हणत मयत तरुणीला त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून तरुणीने गुरुवारी पेट्रोलची बॉटल अंगावर ओतून स्वतः ला पेटवून घेतले. घटनेनंतर तरुणीला परभणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; परंतु उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला. 

दरम्यान, मृत्युपूर्वी दिलेल्या जबाबावरून नागनाथ बोंदरे, रंजना बोंदरे (रा. धारासूर, ता. गंगाखेड) व कार्तिक मिराशे (रा. कहयाळ ता. जिंतूर) या तिघांविरुद्ध सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मंचक फड करत आहेत.

Web Title: Tired of suffering, the young woman ended her life; Crime against three on death row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.