गंगाखेड महामार्गावर दोन तासांत तीन अपघात; दोघे ठार, दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 18:56 IST2023-02-24T18:51:42+5:302023-02-24T18:56:13+5:30
परभणी-गंगाखेड रस्त्यावर झाले अपघात

गंगाखेड महामार्गावर दोन तासांत तीन अपघात; दोघे ठार, दोघे जखमी
- लक्ष्मण कच्छवे
दैठणा ( परभणी) : गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर शूक्रवारचा दिवस अपघातवार ठरला आहे. शूक्रवारी दूपारी २ ते ४ च्या दरम्यान वेगवेगळ्या तीन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये दोघे जण ठार तर दोघे जखमी झाले आहेत. अपघाताच्या घटना दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत.
परभणी-गंगाखेड रस्त्यावरून चालत असणाऱ्या एकास पाठीमागून हायवा ट्रकने पल्लवी कन्सट्रक्शन समोर उडवले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. दूसरा अपघात उमरी फाटा येथे मोटरसायकल व स्कार्पिओ यांचा झाला. या समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. तिसरा अपघात सिंगणापूर फाटा येथे मोटर सायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना परभणीच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.