शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST

परभणी : मंगळवारी रात्री जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पालम, गंगाखेडसह अन्य तालुक्यांतील हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. पुराच्या ...

परभणी : मंगळवारी रात्री जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पालम, गंगाखेडसह अन्य तालुक्यांतील हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. पुराच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून, गंगाखेड आणि पालम या दोन तालुक्यांमधील १८ गावांचा संपर्क तुटला आहे.

मागील चार दिवसांपासून दररोज पाऊस होत आहे. मंगळवारी रात्री पावसाला प्रारंभ झाला. अतिवृष्टीसदृश असलेला हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर बरसला. या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. पालम तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, या तालुक्यातील दोन मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यातील गळाटी आणि लेंडी या नद्यांना पूर आल्याने पालम शहरातील मारुती मंदिरापर्यंत पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे तालुक्यातील १० गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच पुराच्या पाण्यामुळे सुमारे ५ हजार हेक्‍टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. गंगाखेड तालुक्यातील सुनेगावजवळ इंद्रायणी नदीला पूर आला असून, पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने ८ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. तसेच भांबरवाडी येथेही पुरामुळे वाहतूक ठप्प आहे. सेलू तालुक्यातील मोरेगाव-वालूर या मार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद झाला आहे. जिंतूर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून, येलदरी-ईटोली या रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्याने चार तास वाहतूक ठप्प होती. सेलू-पाथरी मार्गावरील लेंडी नदीला पूर आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी होता, तर पालम-ताडकळस या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे.

जीप वाहून गेली; चालक बचावला

सेलू तालुक्यातील कुपटा येथील ओढ्याला पूर आल्याने पुराच्या पाण्यात जीप वाहून गेल्याची घटना घडली आहे. जीपचालक मात्र बालंबाल बचावला आहे.

निम्न दुधनाचे १४ दरवाजे उघडले

सेलू तालुक्यातही जोरदार पाऊस झाला असून, पावसाच्या पाण्यामुळे निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. प्रकल्प पाण्याने १०० टक्के भरला असून, १४ दरवाजे उघडून १४ हजार २८० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.