ठाण्यासमोरील दुकान फोडून चोरट्यांचे पोलिसांना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 15:18 IST2019-10-25T15:14:46+5:302019-10-25T15:18:37+5:30

दुकानास लावलेला कडी-कोंडा तोडून चोरी

Thieves challenges to Police by breaking shop infront of Police station | ठाण्यासमोरील दुकान फोडून चोरट्यांचे पोलिसांना आव्हान

ठाण्यासमोरील दुकान फोडून चोरट्यांचे पोलिसांना आव्हान

गंगाखेड: पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरील पान टपरी फोडून चोरट्यांनी रोख रक्कमेसह ३ लाखाचा ऐवज पळवल्याची घटना शुकवारी (दि. २५) सकाळी उघडकीस आली. पोलीस स्टेशनप्रवेशद्वारासमोरच धाडसी चोरी करून चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसांना आव्हानच दिले असल्याची चर्चा शहरात आहे. 

गंगाखेड पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या एका पान शॉपच्या शटरला लावलेला कडी-कोंडा गुरुवारी (दि. २४) मध्यरात्री चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केला.  चोरट्यांनी गल्ल्यातील रोख ८८ हजार रुपये व दोन लाख २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शुक्रवारी सकाळी ७ वाजता दुकान उघडण्यास आलेले  शेख अन्वर शेख हालीम ( रा. ममता कॉलनी गंगाखेड ) यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदानंद मेंडके करत आहेत. पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर असलेले दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल पळविल्याने व्यापारी वर्गात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलीसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे. हे एकप्रकारे पोलिसांना आव्हानाच असल्याची चर्चा शहरात आहे.

Web Title: Thieves challenges to Police by breaking shop infront of Police station