शिक्षणक्षेत्र सुन्न! शाळेत निघालेल्या दोन शिक्षकांना भरधाव ट्रकने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 10:32 IST2023-03-14T10:31:38+5:302023-03-14T10:32:00+5:30

मानवत शहराजवळील वळण रस्त्यावर पाठीमागून आलेल्या ट्रकने दिली धडक

The education sector is numb! The speeding truck crushed two teachers near Manwat | शिक्षणक्षेत्र सुन्न! शाळेत निघालेल्या दोन शिक्षकांना भरधाव ट्रकने चिरडले

शिक्षणक्षेत्र सुन्न! शाळेत निघालेल्या दोन शिक्षकांना भरधाव ट्रकने चिरडले

मानवत:दुचाकीवरून शाळेत निघालेल्या दोन शिक्षकांना भरधाव ट्रक ने चिरडल्याची घटना वळण रस्त्यावरील महाराणा प्रताप चौकातील उडान पुलाजवळ आज सकाळी 8 वाजता घडली. या अपघातात दोन्ही शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. रामेश्वर कदम आणि गंगाधर राऊळ असे मृत शिक्षकांचे नाव असून या घटनेने शिक्षण क्षेत्र सुन्न झाले आहे.

शहरातील पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शंकूतलाबाई कत्रूवार विद्यालयात शिक्षक रामेश्वर कदम (वय 52) आणि गंगाधर राऊळ ( 52) हे कामा निमित्त बसस्थानक परिसरात गेले होते. काम आटोपून दोघेही एकाच दुचाकीवरशाळेकडे परतत होते. दरम्यान, महाराणा प्रताप चौका जवळ असलेल्या उड्डाणंपुला जवळील रस्ता ओलंडत असताना पाठीमागून सिमेंटचे पोल घेऊन येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. 

यात ट्रकखाली चिरडून दोन्ही शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर ट्रक चालक फरार झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ट्रक जप्त केला आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले. पोनी आनंद बनसोडे, पोलीस नायक बळीराम थोरे यांनी पंचनामा केला. दरम्यान, अपघाताची वार्ता समजताच ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील शिक्षकांनी गर्दी केली.

Web Title: The education sector is numb! The speeding truck crushed two teachers near Manwat