मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा, रामपुरी खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंचासह सदस्यांचे राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 19:26 IST2023-10-27T19:25:39+5:302023-10-27T19:26:02+5:30
तालुक्यातील पाच जिल्हा परिषद सर्कलमध्ये ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा, रामपुरी खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंचासह सदस्यांचे राजीनामे
पाथरी : मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा म्हणून पाथरी तालुक्यातील रामपुरी खुर्द येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचासह सात सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे दिले. याची एक प्रत गटविकास अधिकारी यांनाही देण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटे येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी तीन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला पाठिंबासाठी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद सर्कलमध्ये ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणामध्ये तरुणासोबत महिलांचाही पाठिंबा वाढत आहे. दरम्यान, आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील रामपुरी खुर्द येथील ग्रामपंचायतच्या नऊ पैकी उपसरपंच आणि सात सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले.सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडे सर्वांनी राजीनामे सुपूर्द केले.यामध्ये उपसरपंच अर्चना रामराव मळी,उषा भास्कर चव्हाण, महेश नारायणराव चव्हाण, सतीश पंडितराव राणेर, दिनकर नारायण ननवरे, सुलोचना बालासाहेब भरकड, रिहाना कबीर खान पठाण या सदस्यांचा समावेश आहे