शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानीच्या पंचनाम्याचे प्रस्ताव सादर करा : वडेट्टीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST

परभणी जिल्ह्यात ११ व १२ जुलै रोजी अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये शेतातील पिके, घरांचे मोठे नुकसान ...

परभणी जिल्ह्यात ११ व १२ जुलै रोजी अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये शेतातील पिके, घरांचे मोठे नुकसान झाले. तसेच अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. या अनुषंगाने प्रदेश काँग्रेस कमिटीचे मराठवाडा समन्वयक सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी मंगळवारी मंत्रालयात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. त्यांना यासंदर्भात मागण्यांचे निवेदन दिले. त्यात परभणीत अतिवृष्टीने गजानन नगर, संत सेना नगर, आशीर्वाद नगर, क्रांती चौक, हडको, धाररोड, भीम नगर, साखला प्‍लॉट, दादाराव प्लॉट, कॅनॉल परिसर, अमरधाम स्मशानभूमीच्या मागील बाजूस असलेल्या वसाहती व पाथरी रोड, जिंतूर रोड भागातील छोट्या-मोठ्या वसाहतींमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले होते. यामुळे अनेक घरांना पाण्याने वेढले होते. परिणामी, नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. शिवाय जिल्ह्यात जवळपास १० हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यात ४०० पेक्षा अधिक लहान-मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नुकसान झालेले शेतकरी, नागरिक आणि पशुपालक यांना मदत देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने या नुकसानीचा पंचनामा करून संबंधितांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांच्या पत्रावर मंत्री वडेट्टीवार यांनी परभणी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातील पंचनामे करून मदतीसाठीचा प्रस्ताव तपासून सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे पंचनाम्याचे आदेश

दरम्यान, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी या अनुषंगाने सर्व तहसीलदार, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना पत्र पाठविले असून, त्यात १२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने आपल्या तालुक्यात शेतातील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास पंचनामे करावेत, तसेच यासंदर्भातील संयुक्त अहवाल तत्काळ सादर करावा, असे यासंदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे.