शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे घरी कडक निर्बंध - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:17 IST

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे डॉक्टर, कर्मचाऱ्यांना २४ तास दवाखान्यांमध्ये काम करावे लागत आहे. कोरोनाच्या पहिल्या ...

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे डॉक्टर, कर्मचाऱ्यांना २४ तास दवाखान्यांमध्ये काम करावे लागत आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात या कर्मचाऱ्यांसाठी क्वारंटाईन सेंटरची सुविधा केली होती. मात्र, या टप्प्यात या सुविधांना फाटा देण्यात आला. त्यामुळे सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना ड्युटी संपल्यानंतर घरी जावे लागते. घरातील कुटुंबीयांना कोरोनाची लक्षणे जाणवू नयेत. कोरोनापासून दूर राहावे, यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना घरी कडक निर्बंध पाळावे लागत आहेत. संपूर्ण घर सॅनिटाईज करावे लागत आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांपासून विलग राहणे यासह इतर बाबी ही मंडळी कटाक्षाने पाळत आहेत. परंतु राज्य शासनाकडून मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य सुरक्षिततेसंदर्भात कोणतीही काळजी घेतली जात नाही. स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कर्मचार्‍यांची काळजी शासनानेही घेणे गरजेचे आहे. त्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता वाढली आहे.

घरच्यांची धाकधूक वाढली

आई-बाबा दोघेही दवाखान्यात काम करतात. कोरोनाच्या रुग्णांना ते बरे करतात. त्यामुळे त्या दोघांची आम्हाला काळजी वाटते, अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांचा मुलांनी दिली.

घरात पत्नी व दोन लहान मुले असल्याने कोविड सेंटरमधून घरी येताच मी स्नान करतो. कपडे गरम पाण्यात धुवून घेतो. नंतर मिठाच्या पाण्याने गुळण्या करून घेतो. घरात नवीन मास्क लावतो. लहान मुलांमुळे घरातही ६ फुटाचे अंतर पाळतो. उध्दव राऊत, वार्ड कर्मचारी, सेलू

रुग्ण सेवा देणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. ड्युटीवरून घरी गेल्यानंतर गरम पाण्याने स्नान करतो. सर्व कपडे स्वच्छ सॅनिटायझर करून घेतो. नवीन मास्क घालतो. घरात आई, वडील व आजी असल्याने मी एका स्वतंत्र खोलीत राहतो. कुटुंबाच्या संपर्कात येणे टाळतो. रवी लाडाने,

कोविड सेंटर, सेलू.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, अशा स्थितीत आरोग्य सेवा देताना कुटुंबाची काळजी वाटते. पण, कर्तव्य तितकेच महत्त्वाचे आहे. ड्युटीवरून घरी गेल्यानंतर कपडे व इतर साहित्य सॅनिटाईज करतो. गरम पाण्याने स्नान करुन नवीन मास्क लावून नंतरच घरात प्रवेश करतो. आई ,वडील व भाऊ यांच्यापासून ६ फूट अंतरावर राहून काळजी घेतो. डॉ. सुरज अंभोरे, सेलू.