सोयाबीन आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:29 IST2021-02-06T04:29:55+5:302021-02-06T04:29:55+5:30
पुलाच्या कामात चुरीचा वापर पालम: पालम ते ताडकळस या रस्त्यावर जागोजागी पुलाच्या बांधकाम करताना मोठ्या प्रमाणात चुरीचा वापर केला ...

सोयाबीन आवक वाढली
पुलाच्या कामात चुरीचा वापर
पालम: पालम ते ताडकळस या रस्त्यावर जागोजागी पुलाच्या बांधकाम करताना मोठ्या प्रमाणात चुरीचा वापर केला जात आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्ता प्रश्न निर्माण झाला असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच जुन्या नळकांड्या जैसे थे ठेऊन बाजूला नवीन सिंमेट नळ्या टाकून काम केले जात आहे.
शेतकऱ्यांची अडवणूक सुरू
पालम: तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या उस तोडणीचा कामे केली जात आहेत;परंतु, साखर कारखाना ऊस तोडताना मजुरांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. ऊस तोडणी करण्यासाठी हजारो रुपयाची मागणी केली जात असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
प्रवाशांची कुंचबना
पालम: शहरात राष्ट्रीय मार्गावर बस स्थानक नसल्याने प्रवाशांन तासन् तास एकाच जागेवर ताटकळत उभे राहावे लागत आहे कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने प्रवाशांची कुंचबणा होत आहे. याकडे सरकारी यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे