परभणीतील नवा मोंढा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत सहा कृषी दुकाने फोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 19:01 IST2025-10-28T19:00:59+5:302025-10-28T19:01:09+5:30
दोन लाखांहून अधिक रोकड व कृषी साहित्य लंपास; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

परभणीतील नवा मोंढा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत सहा कृषी दुकाने फोडली
- मारोती जुंबडे
परभणी : शहरातील नवा मोंढा परिसरात चोरट्यांनी एकाच रात्रीत सहा कृषी दुकाने फोडून २ लाख १० हजार ५०० रुपयांची रोकड व कृषी साहित्य लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात सायंकाळी सुमारे सहा वाजता अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरीची घटना मंगळवारी पहाटे तीन ते सहा वाजेच्या दरम्यान घडली.
चोरट्यांनी नवा मोंढा भागातील जय किसान कृषी केंद्र, त्रिमूर्ती ऍग्रो एजन्सी, ट्रेडिंग कंपनी, किरण ट्रेडिंग कंपनी, वरद ट्रेडर्स आणि श्री साई एजन्सी ही सहा दुकाने फोडली. दुकानांचे शटर उचकटून रोकड व कृषी साहित्य लंपास करण्यात आले.ही चोरीची घटना मंगळवारी पहाटे तीन ते सहा वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी नवा मोंढा भागातील जय किसान कृषी केंद्र, त्रिमूर्ती ऍग्रो एजन्सी, मुकेर ट्रेडिंग कंपनी, किरण ट्रेडिंग कंपनी, वरद ट्रेडर्स आणि श्री साई एजन्सी ही सहा दुकाने फोडली. दुकानांचे शटर उचकटून रोकड व कृषी साहित्य लंपास करण्यात आले.
सकाळी व्यापारी दुकान उघडण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व तपास सुरू केला आहे.