लसीकरण न केलेल्या दुकानदाराला जिल्ह्याधिकाऱ्यांनी ठोठावला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:17 AM2021-09-13T04:17:48+5:302021-09-13T04:17:48+5:30

जिल्ह्याधिकारी आंचल गोयल यांनी शहरातील गांधी पार्क, शिवाजी चौक जनता मार्केट, कच्छी बाजार आणि जुना मोंढा परिसर भागात ...

Shopkeeper fined for not vaccinating | लसीकरण न केलेल्या दुकानदाराला जिल्ह्याधिकाऱ्यांनी ठोठावला दंड

लसीकरण न केलेल्या दुकानदाराला जिल्ह्याधिकाऱ्यांनी ठोठावला दंड

Next

जिल्ह्याधिकारी आंचल गोयल यांनी शहरातील गांधी पार्क, शिवाजी चौक जनता मार्केट, कच्छी बाजार आणि जुना मोंढा परिसर भागात रविवारी दुुपारी अचानक भेट दिली. बाजारात सणासुदीमुळे झालेली गर्दी व त्यात महापालिकेने दुकानदारांना लसीकरण करण्याचे केलेेले आवाहन याची पाहणी जिल्हाधिकारी गोयल यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत पालिका आयुक्त देवीदास पवार, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, नगरसचिव विकास रत्नपारखी, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, अल्केश देशमुख, राजकुमार जाधव, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुऱ्हा, मेहराज यांच्यासह मनपाचे १५ जणांचे पथक बाजारात कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते.

जिल्हाधिकारी पायी फिरून उतरल्या कारवाईसाठी

विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांसह दुकानदारांवर त्यांनी दंडात्मक कारवाई केली. तसेच ज्या दुकानदारांनी अजूनपर्यंत पहिले लसीकरण करून घेतले नाही, त्यांची दुकाने बंद करण्याची कारवाई जिल्ह्याधिकाऱ्यांनी केली. यापुढे जे दुकानदार लस न घेता दुकाने उघडतील त्यांना ५ हजार रुपये दंड लावला जाईल. तसेच ज्या दुकानातील मालक आणि कर्मचारी यांनी दोन्ही लस घेतल्या असल्यास त्याचे प्रमाणपत्र दुकानाबाहेर लावूनच आपली दुकाने उघडी करावी, असे निर्देश जिल्ह्याधिकारी गोयल यांनी व्यापाऱ्यांना दिले. यावेळी महापालिकेकडून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर २०० रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. यानुसार ७७ जणांवर कारवाई करत १५ हजार ४०० रुपये दंड आणि एक दुकानावर कारवाई करत १० हजार दंड करण्यात आला.

एक दुकानदार पळून गेला

बाजारात जिल्हाधिकारी गोयल या स्वत: पायी फिरून दुकानांवर जाऊन लसीकरण केले का? याची माहिती घेत होत्या. यावेळी एक दुकानदार जिल्हाधिकारी व पथकाला पाहून पळून गेल्याने या दुकानाला दंड लावण्यात आला. तसेच अन्य एक दुकान सील करण्यात आले. लसीकरण पूर्ण केल्यावरच ही दोन्ही दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

लसीकरण कॅम्प उभारला

बाजारातील शिवाजी चौक येथे रविवारी पाहणी सुरू करण्यापूर्वी येथे व्यापारी वर्गासाठी लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सोमवारी अजून ३ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहेत. अशीच पाहणी व कारवाई यापुढे केली जाणार आहे. लसीकरण न करता दुकान सुरू ठेवू नये. - देवीदास पवार, आयुक्त.

Web Title: Shopkeeper fined for not vaccinating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.