धक्कादायक ! पत्नीचा आजार बळावला; औषध उपचाराला कंटाळून पतीने तिला संपवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 13:45 IST2021-03-14T13:43:41+5:302021-03-14T13:45:40+5:30
पाथरी तालुक्यातील मुदगल येथील घटना

धक्कादायक ! पत्नीचा आजार बळावला; औषध उपचाराला कंटाळून पतीने तिला संपवले
पाथरी - पत्नी आजारी असल्याने तिच्या गोळ्या औषधी चा खर्च परवडत नसल्याने पतीनेच पत्नीचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना पाथरी तालुक्यातील मुदगल येथे 13 मार्च रोजी रात्री 7.30 च्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी आज पहाटे पाथरी पोलीस ठाण्यात आरोपी पती विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथरी तालुक्यातील मुदगल येथील कमलाकर बाबासाहेब शिंदे यांची पत्नी कविता शिंदे आजारी असल्याने सतत गोळ्या औषध लागत होते. बायकोच्या गोळ्या औषधीला कंटाळून कमलाकर शिंदे यांनी आपल्या पत्नीचा धारदार शस्त्राने खून केला. हा प्रकार 13 मार्च रोजी रात्री 7.30 च्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी सुरज मदनराव जामगे यांच्या फिर्यादीवरून कमलाकर शिंदे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.