धक्कादायक ! परभणीत पोलिस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 13:04 IST2021-07-09T13:04:15+5:302021-07-09T13:04:27+5:30
Police constables suicide in Parabhani : परभणी शहरातील लक्ष्मीनगर भागात किरायाने राहत असलेले पोलीस शिपाई रामेश्वर दिलीप बारहाते (३५, मुळ गाव सेलू ) पोलीस मुख्यालयात नोकरीस होते.

धक्कादायक ! परभणीत पोलिस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या
परभणी: येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत एका कर्मचाऱ्याने घरातील छतावरील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री उघडकीस आली आहे.
परभणी शहरातील लक्ष्मीनगर भागात किरायाने राहत असलेले पोलीस शिपाई रामेश्वर दिलीप बारहाते (३५, मुळ गाव सेलू ) पोलीस मुख्यालयात नोकरीस होते. बारहाते यांनी त्यांच्या घरातील छतावरील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची बाब गुरूवारी रात्री १० वाजता उघडकीस आली. याबाबत नानलपेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृहदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आला. रामेश्वर बारहाते यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटेनची नानलपेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.