सनकी आजोबाचे कौर्य; अंगणात खेळणाऱ्या नातवाचा विळ्याने वार करून केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 19:31 IST2020-10-12T19:21:25+5:302020-10-12T19:31:15+5:30
Grandfather killed his grandson by stabbing in Parabhani District सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान बालकाचा मुत्यू

सनकी आजोबाचे कौर्य; अंगणात खेळणाऱ्या नातवाचा विळ्याने वार करून केला खून
सेलू :- अंगणात खेळत असलेल्या ६ वर्षीय नातवाच्या पोटावर चुलत आजोबाने धारदार विळ्याने वारकरून खून केला. ही धक्कादायक घटना तालुक्यातील चिकलठाणा बु येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पोलीसांनी आरोपी दिगंबर गणपत जाधव (५२) यास अटक केली आहे.
चिकलठाणा बु येथे आदिराज श्रीराम जाधव हा ६ वर्षीय बालक घराच्या अंगणात खेळत असतांना त्याचा चुलत आजोबा दिगंबर गणपत जाधव (५२) याने आदिराजचा अचानक गळा दाबण्यास सुरूवात केली. हा प्रकार बालकाच्या आईने पाहताच आदिराज यास वाचविण्यासाठी धावली. आजोबाच्या तावडीतून बालकाला सोडविण्याचा प्रयत्न केला. पंरतु, दिगंबर याने हातातील विळयाने आदिराज याच्या पोटावर वार करून गंभीर जखमी केले. सदरील बालकास सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्याचा दुदैवी मुत्यू झाला.
आरोपी अटकेत
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांनी चिकलठाणा येथे जाऊन आरोपी दिगंबर गणपत जाधव यास अटक केली आहे. दरम्यान चुलत आजोबाने नातवाचा खून कोणत्या कारणावरून केला याचा शोध पोलीस घेत आहे. याप्रकरणी सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तीनही घटना या वेगवेगळ्या कारणांनी घडल्या. https://t.co/jznYXPvBA9
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) October 12, 2020