धक्कादायक! परभणीत जबरदस्तीने धर्म परिवर्तनाचा प्रकार; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 17:57 IST2025-11-10T17:55:45+5:302025-11-10T17:57:13+5:30
नानलपेठ पोलिसात गुन्हा नोंद; पीडित कुटुंबाचा आरोप, बळजबरीने विधी करून धर्मांतर

धक्कादायक! परभणीत जबरदस्तीने धर्म परिवर्तनाचा प्रकार; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
परभणी: शहरात जबरदस्तीने धर्म परिवर्तन घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशीराने सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंब हे पाथरी रोडवर परिसरात वास्तव्यास आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ६ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास दोन महिला आणि एक पुरुष त्यांच्या घरासमोर आले. त्यांनी प्रार्थनास्थळ आणि धार्मिक कार्यक्रमांविषयी विचारणा केली. त्यानंतर, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी पीडित कुटुंबाला दुसरीकडे नेण्यात आले. तेथे त्यांना काही पदार्थ (आंबट चव असलेले द्रव) पाजण्यात आले आणि त्यानंतर काही धार्मिक विधी करून तुमचे धर्म परिवर्तन झाले आहे असे सांगण्यात आले. या घटनेनंतर पीडित महिलेने घरात येऊन पतीला संपूर्ण प्रकार सांगितला. पीडित पतीने या बाबत संबंधितांकडे दिलेल्या कागदपत्रांची मागणी केली असता दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पीडित कुटुंबाने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणी प्रतीक मिश्रा, आर्थिक गवळी, पल्लवी गवळी, प्रगती साखरे, अहिल्याबाई कदम आणि संजयकुमार साखरे या सहा जणांविरुद्ध धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे आणि फसवणूक या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी प्रतीक मिश्रा, आरती गवळी, पल्लवी गवळी, प्रगती साखरे, अहिल्याबाई कदम आणि संजुकुमार साखरे या सहा जणांविरुद्ध धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे आणि फसवणूक या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नानलपेठ पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.