पालममध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेचे बँकेसमोर ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 14:33 IST2018-06-25T14:32:50+5:302018-06-25T14:33:58+5:30
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर शिवसेनेच्यातर्फे आज सकाळी अकरा वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले.

पालममध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेचे बँकेसमोर ठिय्या आंदोलन
पालम (परभणी ) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर शिवसेनेच्यातर्फे आज सकाळी अकरा वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच तहसील कार्यालयातसुद्धा ऑनलाईन सातबारा मिळण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांना तत्काळ पिक कर्ज वाटप करावे, कागदपत्रांसाठी बँकेत त्यांची अडवणूक करू नये यासह अन्य मागण्यांसाठी शिअवसेनेच्या वतीने आज सकाळी एसबीआय बँकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी क्षेत्रीय अधिकारी रविराज पेंदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यानंतर आंदोलकांनी ऑनलाईन सातबारा मिळण्यासाठी होत असलेल्या अडचणीमुळे तहसील कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवला. यावेळी तहसीलदार तेजस्विनी जाधव यांना ऑनलाईन सातबारा मिळत नसेल तर हस्तलिखित द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावर तहसीलदार जाधव यांनी मंगळवारपासून ऑनलाईन सातबारा देण्यात येतील असे आश्वासन दिले.
आंदोलनात तालुका प्रमुख हनुमान पौळ, शहर प्रमुख गजानन पवार , पांडुरंग होलगे , शेख मुकरम, चंद्रकांत ताटे , बाळासाहेब लोखंडे, एकनाथ मोहीते , पान्डूरंग रोकडे , सुग्रीव पौळ, नंदू बलोरे , गजानन सिरस्कर आदी सहभागी होते.