उधार पैसे देण्यास नकार दिल्याने दिराने केला विनयभंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 20:07 IST2019-08-13T20:02:50+5:302019-08-13T20:07:41+5:30

पती-पत्नीस दिराने केली मारहाण

sexual harassment by brother in law in Parabhani | उधार पैसे देण्यास नकार दिल्याने दिराने केला विनयभंग 

उधार पैसे देण्यास नकार दिल्याने दिराने केला विनयभंग 

गंगाखेड (परभणी ) : महिलेने उधार पैसे देण्यास नकार दिल्याने दिराने विनयभंग केल्याची घटना सोमवारी (दि. १२) रात्री साडे सात वाजता तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील डोंगरगाव येथे सोमवारी सायंकाळी तीस वर्षीय विवाहिता आपल्या किराणा दुकानात होत्या. यावेळी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास तेथे महिलेचा सावत्र दिर आला. त्याने महिलस ७०० रुपये उधार देण्याची मागणी केली. महिलेने तुमचे भाऊ आल्यानंतर या असे सांगून पैसे देण्यास नकार दिला. यानंतर दिराने दरवाजा बंद करून महिलेचा विनयभंग केला. महिलेने आरडाओरडा केला असता तो राख रक्कम घेऊन पळून गेला. 

यानंतर रात्री ८.३० वाजता महिलेचा पती घरी आला. घडलेला प्रकार महिलेने सांगितला असता पती जाब विचारण्यास गेला. मात्र, सावत्र दीर सावत्र दिर, सावत्र भाया व सावत्र जाऊ या तिघांनी दोघांना मारहाण करून जखमी केले. यानंतर विवाहितेने गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून मंगळवारी (दि.१३ ) पहाटे तिघांविरुद्ध विनयभंग, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास जमादार रतन सावंत, प्रल्हाद वाघ हे करत आहेत.

Web Title: sexual harassment by brother in law in Parabhani