शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांत साडेसात हजार रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:17 IST

परभणी : नवीन बाधित रुग्णांच्या प्रमाणात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून, आठवडाभरात ७ हजार ६२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले ...

परभणी : नवीन बाधित रुग्णांच्या प्रमाणात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून, आठवडाभरात ७ हजार ६२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मागील एक आठवडाभरापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. नवीन बाधित रुग्णांच्या तुलनेत दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ३ ते १० मे या एक आठवड्यात ५ हजार ८८ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७ हजार ६२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. संपूर्ण आठवड्यात बाधित रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने हा संसर्ग कमी होत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नवीन रुग्णांची नोंद होत होती. शिवाय रुग्णांच्या मृत्यूमुळेही नागरिकांत धास्ती निर्माण झाली होती. आतापर्यंतच्या रुग्णवाढीचा दर पाहिला तर एका दिवसातील १४०० रुग्णसंख्या सर्वाधिक ठरली असून, हा जिल्ह्याचा पीक पॉइंट आहे. मात्र, त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत असल्याने कोरोना संसर्ग ओसरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

सोमवारी नोंद झाले सर्वाधिक कोरोनामुक्त

३ ते १० मे या काळात ७ हजार ६२५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यात १० मे रोजी सर्वाधिक १ हजार २६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्याचप्रमाणे ३ मे रोजी १ हजार २२० रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. या आठ दिवसांच्या काळात ४ दिवस कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या १ हजार पेक्षा अधिक आहे.

रुग्णांच्या मृत्यूचे सत्र थांबेना

कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र अजूनही कमी झाले नाही. दररोज रुग्णांचे मृत्यू होत आहेत. ३ ते १० मे या आठ दिवसांमध्ये ११८ रुग्णांचा मृत्यू झाला. ४, ६ आणि ७ मे हे तीन दिवस जिल्ह्यासाठी क्लेशकारक ठरले. या तीनही दिवसांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. ६ मे रोजी २४ रुग्णांचा मृत्यू झाला. ७ मे रोजी २३ तर ४ मे रोजी २० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

आठवडाभरात कोरोनामुक्त झालेले रुग्ण

०३ मे १२२०

०४ मे ९४३

०५ मे ८०४

०६ मे ६३९

०७ मे ६८४

०८ मे १०३३

०९ मे १०३७

१० मे १२६५