'गोलु'ला वाचवा! आजीसोबत शेतात आलेला ४ वर्षाचा चिमुकला पडला बोअरवेलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 15:42 IST2023-08-09T15:41:23+5:302023-08-09T15:42:00+5:30

महसूल, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाचे पथकाचे बचाव कार्य सुरु

Save 'Golu'! A 4-year-old boy who came to the farm with his grandmother fell into the borewell | 'गोलु'ला वाचवा! आजीसोबत शेतात आलेला ४ वर्षाचा चिमुकला पडला बोअरवेलमध्ये

'गोलु'ला वाचवा! आजीसोबत शेतात आलेला ४ वर्षाचा चिमुकला पडला बोअरवेलमध्ये

- सत्यशील धबडगे
मानवत:
तालुक्यातील उक्कलगाव शिवारातील एका शेतात असलेल्या बोअरवेलमध्ये ४ वर्षाचा चिमुकला पडल्याची घटना आज दुपारी १२ वाजता घडली. गोलू सुरेश पिंपळे असे चिमुकल्याचे नाव आहे.

उक्कलगाव शिवारातील शेतात खुरपणी सुरु आहे. येथे एक आजी ४ वर्षांच्या नातवासोबत आली आहे. आजी खुरपणी करत असताना चिमुकला शेतात खेळत होता. सर्वजण कामात व्यस्त असताना अचानक मुलगा दिसेनासा झाला. शोध घेतला असता काहीवेळाने चिमुकला शेतातील बोअरवेळच्या खड्ड्यात पडल्याचे आढळून आले. 

दरम्यान, माहिती मिळताच घटनास्थळी महसूल, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे. चिमुकला खड्ड्यात १० ते १५ फुट आत असल्याचा अंदाज आहे. त्याच्याशी संपर्क करण्यात येत आहे. बोअरवेलच्या बाजूस जेसीबीच्या सहाय्याने दुसरा खड्डा करण्यात येत आहे. या समांतर खड्ड्यातून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Save 'Golu'! A 4-year-old boy who came to the farm with his grandmother fell into the borewell