नऊ गावांमध्ये स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:17 IST2021-02-12T04:17:05+5:302021-02-12T04:17:05+5:30

जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या पुढाकारातून जिल्हाभरात जि. प.च्या वतीने स्वच्छता व प्लॅस्टिकमुक्ती अभियान ११ ते ...

Sanitation campaign in nine villages | नऊ गावांमध्ये स्वच्छता अभियान

नऊ गावांमध्ये स्वच्छता अभियान

जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या पुढाकारातून जिल्हाभरात जि. प.च्या वतीने स्वच्छता व प्लॅस्टिकमुक्ती अभियान ११ ते १८ फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ११ फेब्रुवारी रोजी सेलू तालुक्यातील नऊ गावांमध्ये पहिल्याच दिवशी या अभियानाला प्रारंभ झाला. त्यामध्ये ब्रह्मवाकडी, कुंडी, हादगाव, शिराळा, खेर्डा, देऊळगाव गात, माले टाकळी, वालूर, निपाणी टाकळी या गावांचा समावेश आहे. या अभियानात सहावी ते बारावीचे विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. अभियानाचा प्रारंभ गोमेवाकडी येथे करण्यात आला. यावेळी जि.प.चे समाज कल्याण अधिकारी सचिन कवले, बीडीओ विष्णू मोरे, सहायक बीडीओ डी. एस. अहिरे आदींची उपस्थिती होती. यावेळी प्लॅस्टिक व अविघटन कचरा गोळा करण्यात आला. आपले गाव स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी या अभियाना सहभागी होण्याचे आवाहन कवले यांनी केले.

Web Title: Sanitation campaign in nine villages