शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
3
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
4
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
5
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
6
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
7
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
8
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
9
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
10
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
11
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
12
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
13
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
14
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
15
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
16
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
17
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
18
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
19
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
20
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

परभणी जिल्ह्यात पावसाचा पुन्हा कहर; पालम, गंगाखेडात ढगफुटी, २१ मंडळांत अतिवृष्टी

By मारोती जुंबडे | Updated: September 27, 2025 14:00 IST

परभणी जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे

परभणी: जिल्ह्यावर पुन्हा एकदा निसर्गाचा कहर कोसळला आहे. शनिवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पालम व गंगाखेड तालुक्यात ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील तब्बल २१ महसूल मंडळांत शनिवारी अतिवृष्टीची नोंद झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गत पंधरा दिवसांपासून कधी मुसळधार तर कधी ढगफुटीसदृश्य पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेती, रस्ते, गावे व पायाभूत सुविधा पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच शनिवारी गंगाखेड तालुक्यातील जवळा येथील हनुमान मंदिरावर वीज पडून शिखराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच खळी गावात पाणी शिरल्याने दोन शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरले.

पूर्णा तालुक्यातील चुडावा येथे गोदावरी नदीचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने नांदेड–पूर्णा राज्य महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. याच भागात दोन जनावरे पुरात अडकली. गंगाखेड–राणीसावरगाव रस्ता गळाटी नदीला पूर आल्याने मध्यरात्रीपासून बंद आहे, तर गंगाखेड–पालम रस्त्यावर केरवाडी नजीक नदीला पूर आल्याने वाहतुकीवर मर्यादा आणण्यात आल्या आहेत. यामुळे गंगाखेड–लोहा, गंगाखेड–रावराजुर, गंगाखेड–बडवणी या मार्गांवरील हालचाल ठप्प झाली आहे.

दरम्यान, पालम तालुक्यात लेंडी नदीला पूर आल्याने पूयणी गाव थेट पाण्याच्या वेढ्यात आले आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर या खरीप पिकांचे पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. मात्र, सलग पावसामुळे शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट कोसळले असून तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे.

पालम,गंगाखेडात शनिवारी विक्रमी पाऊसपालम तालुक्यातील पालम १५३.३, चाटोरी १४३.०, बनवस १३९.८, रावराजुर ११३.० आणि पेठशिवणी १११.५ या महसूल मंडळांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तर गंगाखेड तालुक्यात राणीसावरगाव १४३.०, पिंपळदरी १११.३ व गंगाखेड शहर १०६.३ येथे मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्हाभरात पाणीच पाणी झाल्याने खरीप हंगाम पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.

तालुका निहाय पावसाची नोंद २४ तासांत):परभणी तालुका (मि.मी)दैठणा ७९.० मि.मी.पिंगळी ६५.८परभणी ग्रामीण ६५.८गंगाखेड तालुकागंगाखेड १०६.३महादपुरी ९१.५माखणी ८२.३राणीसावरगाव १४३पिंपळदरी १११.३पूर्णा तालुकापूर्णा ७५.०ताडकळस ९७.८लिमला ७७.०कातनेश्वर ६७.५चुडावा ८५.८कावलगाव ९९.८पालम तालुकापालम १५३.३चाटोरी १४३.०बनवस १३९.८पेठशिवणी १११.५रावराजुर ११३.०सोनपेठ तालुका आवलगाव ६५.८वडगाव ७६.८

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Hit by Rain Again: Cloudbursts, Severe Flooding Reported

Web Summary : Parbhani district faces severe flooding after heavy rains and cloudbursts in Palam and Gangakhed. Twenty-one revenue circles experienced extreme rainfall, disrupting life. Rivers overflow, damaging crops and infrastructure. Rescue teams are on alert as residents grapple with the natural disaster, needing urgent aid.
टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरीfloodपूर