शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

५ कोटींच्या आमदार निधीतून कोविडसाठीची साहित्य खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:18 AM

राज्य शासनाच्या वतीने आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक वर्षी एका आमदारांना मतदारसंघात विविध विकासकामे करण्यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी ...

राज्य शासनाच्या वतीने आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक वर्षी एका आमदारांना मतदारसंघात विविध विकासकामे करण्यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी देण्यात येतो. गेल्या वर्षीपासून राज्यावर कोरोनाचे संकट आल्याने आमदार निधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी खर्च करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली होती. यावर्षीही असाच निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील विधानसभा व विधान परिषदेतील आमदारांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी २३ एप्रिल रोजी वितरित करण्याचे आदेश नियोजन विभागाच्या वतीने काढण्यात आले आहेत. त्यानुसार आ. डॉ. राहुल पाटील, आ. सुरेश वरपूडकर, आ. मेघना बोर्डीकर, आ. बाबाजानी दुर्राणी आणि आ. रत्नाकर गुट्टे या पाच आमदारांना प्रत्येकी १ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. या निधीतून आता कोविड उपाययोजनांसाठी लागणारी यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार आमदारांना या निधीमधून शासकीय आरोग्य संस्थांसाठी ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजन सिलिंडर, रेग्युलेटर्स, हॉस्पिटल बेड्‌स, आयसीयू बेड्स, व्हायटलसाइन मॉनिटर्स, एनआयसीयू व्हेंटिलेटर्स, बायपॅप मशीन्स, स्ट्रेचर्स, पेशंट ट्रॉलीज, इमर्जन्सी ट्रॉलीज, फार्मासिटिकल फ्रिजेस, व्हॅक्सिन बॉक्सेस, कोरोना प्रतिबंधात्मक औषधी व यंत्रसामुग्री आदी साहित्य खरेदी करण्याचे सूचित करण्यात आले होते. याशिवाय आता ५ मे रोजी नियोजन विभागाने काढलेल्या आदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लांट व ऑक्सिजन साठवणूक टँक खरेदी करण्यासही परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये येत्या काही दिवसांत आमदार निधीतून हे साहित्य उपलब्ध होण्याची शक्यता आहे.