शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

परभणीत देशात सर्वाधिक पेट्रोल दर; तेलडेपोच्या जास्तीच्या अंतराचा परभणीकरांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:52 IST

सर्वाधिक पेट्रोल दरामुळे देशभरात चर्चेत आलेल्या परभणी जिल्ह्याला तेलडेपोंच्या अंतराचा फटका सहन करावा लागत आहे. जिल्ह्यापासून सुमारे ३३० कि.मी. अंतरावर तेलडेपो असल्यानेच देशात सर्वाधिक किंमत मोजून परभणीकरांना पेट्रोल विकत घ्यावे लागत आहे. या दरवाढीचा जिल्ह्यातून कडाडून विरोध केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सर्वाधिक पेट्रोल दरामुळे देशभरात चर्चेत आलेल्या परभणी जिल्ह्याला तेलडेपोंच्या अंतराचा फटका सहन करावा लागत आहे. जिल्ह्यापासून सुमारे ३३० कि.मी. अंतरावर तेलडेपो असल्यानेच देशात सर्वाधिक किंमत मोजून परभणीकरांना पेट्रोल विकत घ्यावे लागत आहे. या दरवाढीचा जिल्ह्यातून कडाडून विरोध केला जात आहे.देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून, या दरवाढीचा सर्वाधिक फटका येथील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इतर वस्तूंचेही भाव वाढत आहेत. परभणी जिल्ह्यातच पेट्रोल आणि डिझेलचे दर एवढे जास्त का? याचा आढावा घेतला असता तेलडेपोंचे अंतरच दरवाढीसाठी कारणीभूत ठरल्याची बाब समोर आली.परभणी जिल्ह्यात मनमाड आणि सोलापूर येथून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होतो. दोन्ही तेलडेपोंचे अंतर जिल्ह्यापासून साधारणत: ३०० कि.मी. पेक्षा अधिक आहे.इंधन पुरवठा करताना इंधनाच्या मूळ किंमतीमध्ये व्हॅट, राज्य शासनाचा कर आणि वाहतूक खर्च लावला जातो. मूळ किंमतीवर ३९.८ टक्के व्हॅट आणि २.४० रुपये प्रति लिटर प्रति किलोमीटर या प्रमाणे वाहतूक खर्च लावला जाते. ३०० कि.मी. अंतराच्या आत एकही तेलडेपो नसल्याने जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचे भाव सर्वाधिक झाले आहेत. त्यामुळे तेलडेपोंचे अंतरच परभणी जिल्ह्याच्या मुळावर उठले आहे. देशभरात दरवाढीच्या झळा बसत असल्या तरी परभणीत त्याची तीव्रता अधिक आहे.परभणीला मंजूर झाला होता तेलडेपोराज्याच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता परभणी जिल्हा हा मध्यवर्ती ठिकाणी असल्याने १५ वर्षांपूर्वी परभणी तालुक्यातील पेडगाव येथे तेलडेपो उभारण्यास मंजुरी मिळाली होती.मुंबईपासून ते परभणीपर्यंत पाईपलाईनद्वारे तेल पोहोचती करणे आणि परभणीतून इतर जिल्ह्यांना तेल पुरवठा करण्याचा हा प्रकल्प होता. परंतु राजकीय उदासिनतेमुळे हा प्रकल्प परभणीत होऊ शकला नाही. अखेर परभणी ऐवजी मनमाड येथे हा तेलडेपो उभारण्यात आला.कर वाढविल्यानेच फटका२०१४ मध्ये कच्च्या तेलाचे जे दर होते तेच २०१८ मध्येही आहेत. आॅगस्ट २०१४ मध्ये पेट्रोल ६२.९२ रुपये लिटर होते तर आता तेच पेट्रोल ८९.७५ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलवर मोठ्या प्रमाणात एक्साईज ड्युटी वाढविली. तसेच राज्य सरकारचाही वेगळा कर लावला जात आहे. या करांमुळेच पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढत आहेत. केंद्र शासन जनतेला वेठीस धरुन कराच्या माध्यमातून उत्पन्न कमावत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर जीएसटीच्या मर्यादेत आणले तर २० ते ३० रुपयांनी दर कमी होऊ शकतात. परंतु सरकार जनतेला दाबण्याचे तंत्र अवलंबत आहे, असा आरोप कॉ.राजन क्षीरसागर यांनी केला.इथेनॉल निर्मितीला चालना द्यावीइंधन दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी बायोडिझेलचा वापर होणे आवश्यक आहे. यासाठी इथेनॉल निर्मितीला चालना दिली पाहिजे. विशेष म्हणजे, यापूर्वी भाजपाचे सरकार देशात असताना पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढविले होते. आताही भाजपाचेच सरकार सत्तेत आहे. मात्र इथेनॉलचे प्रमाण वाढविण्याऐवजी कमी केले जात आहे. त्याचा भुर्दंड संपूर्ण देशाला भोगावा लागत आहे.किशोर ढगे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनावस्तू, सेवा कर लागू करा४पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लागू केली तर दर कमी होऊ शकतात. त्यामुळे पेट्रोल, डिझेल जीएसटी खाली आणावे, अशी आमची यापूर्वीपासूनची मागणी आहे. विशेष म्हणजे, जीएसटी लागू केल्यास संपूर्ण देशात इंधनाचे दर एकच राहतील.अमोल भेडसूरकर,अध्यक्ष, परभणी जिल्हा पेट्रोल, डिझेल डिलर असो.

टॅग्स :parabhaniपरभणीPetrolपेट्रोल