परभणी जि.प. कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 23:55 IST2019-07-02T23:55:38+5:302019-07-02T23:55:46+5:30

अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्नांवर २ जुलै रोजी दुपारी २ वाजता येथील जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन करुन प्रशासनाला निवेदन दिले.

Parbhani zip Employees' Ghantanad movement | परभणी जि.प. कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन

परभणी जि.प. कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्नांवर २ जुलै रोजी दुपारी २ वाजता येथील जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन करुन प्रशासनाला निवेदन दिले.
जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाºया सर्व संवर्गातील कर्मचाºयांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महाराष्ट्र राज्य जि.प. कर्मचारी युनियनने या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र कर्मचाºयांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याने मंगळवारी जि.प. कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्याच प्रमाणे तालुकास्तरावर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांच्या कार्यालयासमोरही हे आंदोलन करण्यात आले. परभणी जि.प. कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनात संघटनेचे नागनाथ कापसे, गजानन लोंढे, ज्ञानेश्वर शेळके, विजय जोशी, वैद्यनाथ खडकीकर, विलास चौधरी, माधुरी कुलकर्णी आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Parbhani zip Employees' Ghantanad movement