परभणी : कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:23 IST2018-10-23T00:23:09+5:302018-10-23T00:23:37+5:30

पालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्या विरोधात जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनाचा निषेध नोंदवित पालिकेतील कर्मचाºयांनी २२ आॅक्टोबर रोजी लेखणीबंद आंदोलन केले.

Parbhani: Written Action of the employees | परभणी : कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन

परभणी : कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): पालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्या विरोधात जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनाचा निषेध नोंदवित पालिकेतील कर्मचाºयांनी २२ आॅक्टोबर रोजी लेखणीबंद आंदोलन केले.
कॉँग्रेसच्या दहा नगरसेवकांंनी २० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले होेते. या निवेदनात मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगत लेखणीबंद आंदोलन केले. या आंदोलनात पालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे, कार्यालयीन अधीक्षक शाकेर अली, लेखापाल शेषराव बोरेवाड, नागेश करभरणे, श्यामसुंदर दशरथे, उबेद चाऊस, शिवानंद शिवणकर, राम वाघमारे, मुंतजीब खान, रावसाहेब झोडपे, संजय चिद्रवार यांंच्यासह सर्व विभागातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर कर्मचाºयांंनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देणार असल्याची माहिती दिली.

Web Title: Parbhani: Written Action of the employees