परभणी : बसपोर्ट कामास ‘एनओसी’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:25 AM2020-01-25T00:25:37+5:302020-01-25T00:26:37+5:30

येथे १३ कोटी रुपये खर्च करून एसटी महामंडळाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टच्या कामाला राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र अदद्यापही मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे़ दोन वर्षांपासून या संदर्भातील प्रक्रिया एसटी महामंडळाला पूर्ण करता आलेली नाही़

Parbhani: Waiting for 'NOC' for busport work | परभणी : बसपोर्ट कामास ‘एनओसी’ची प्रतीक्षा

परभणी : बसपोर्ट कामास ‘एनओसी’ची प्रतीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथे १३ कोटी रुपये खर्च करून एसटी महामंडळाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टच्या कामाला राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र अदद्यापही मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे़ दोन वर्षांपासून या संदर्भातील प्रक्रिया एसटी महामंडळाला पूर्ण करता आलेली नाही़
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी येथील बसस्थानकाचे रुपांतर अद्यायवत अशा बसपोर्टमध्ये करण्यासाठी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी १३ कोटी ४ लाख ४८ हजार ६०० रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती़ परभणी बसस्थानकाची सातत्याने दुरवस्था होत असल्याने हे बसस्थानक अद्यावत करण्याची संकल्पना दिवाकर रावते यांनी मांडली होती़ आ़ डॉ़ राहुल पाटील यांनीही सातत्याने पाठपुरावा करून परभणी शहरासाठी बसपोर्ट मंजूर करून घेतले़ अद्यायवत सोयी-सुविधांनी युक्त असे बसपोर्ट परभणीच्या सौंदर्यात भर घालणारे ठरणार आहे; परंतु, कधी निविदा प्रक्रियेत तर कधी न्यायालयीन प्रक्रियेमुळे या बसपोर्टच्या प्रत्यक्ष कामाला दोन वर्षानंतरही सुरुवात करण्यात आलेली नाही़ सद्यस्थित संबंधित कंत्राटदाराने बसस्थानकाची मूळ इमारत पाडण्यास सुरुवात केलेली आहे़; परंतु, अद्यापही एसटी महामंडळ प्रशासनाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही़ त्याचबरोबर फुटींगसाठी फेरआराखडा तयार करण्याच्या वास्तुविशारदकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत़ त्यामुळे एसटी महामंडळ प्रशासन व लोकप्रतिनिधींनी एकत्र बैठक घेऊन या बसपोर्टच्या कामाला गती देण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशीही मागणी प्रवाशांमधून केली जात आहे़
कागदपत्रांची होईना पूर्तता
४एसटी महामंडळ प्रशासनाकडून बसपोर्ट उभारणीच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे; परंतु, पहिल्या मूळ नकाशानुसार एसटी महामंडळ प्रशासनाने महानगरपालिकेच्या मार्फत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे नाहरकत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी प्रस्ताव दाखल केला होता; परंतु, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सद्यस्थितीला बसस्थानकासमोरील रस्ता आमच्याकडे येत नसून तो रस्ता आता जिल्हा मार्गमध्ये मोडतो़ त्यामुळे आमच्याकडे नाहरकत प्रमाणपत्र देता येणार नाही, असे म्हटले आहे़ त्यामुळे आता एसटी महामंडळ प्रशासनाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे़; परंतु, एसटी महामंडळ प्रशासनाकडून नाहकरत प्रमाणपत्रासाठी लागणाºया कागदपत्रांचीच अद्यापपर्यंत पूर्तता करण्यात आलेली नाही़ त्यामुळे एनओसीसाठी दोन वर्षे उलटूनही प्रतीक्षाच करावी लागत असल्योच दिसत आहे़
लोकप्रतिनिधींच्या सुचनांकडेही दुर्लक्ष
४बसस्थानकाची मूळ इमारत जमीनदोस्त केल्यानंतर प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरुपात शेड तयार केले आहे़; परंतु, हे शेड केवळ शहरी प्रवाशांसाठीच आहे़
४त्यामुळे ग्रामीण भागासाठी धावणाºया बसची वाट पाहताना प्रवाशांना शौचालयाच्या इमारतीचा सहारा घ्यावा लागत आहे़ त्याचबरोबर या ठिकाणी आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी भेट देऊन प्रवाशांसाठी वॉटर फिल्टर उभारावे, धूळ कमी होईल, यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना एसटी महामंडळ प्रशासनाला केल्या होत्या़
४त्या सूचनांची पुर्तता एसटी महामंडळाने अद्याप केलेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे़

Web Title: Parbhani: Waiting for 'NOC' for busport work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.