परभणी : वस्सा येथे ५० हजार रुपयांची दारु पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 23:24 IST2019-04-13T23:23:51+5:302019-04-13T23:24:08+5:30

जिंतूर तालुक्यातील वस्सा येथे पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात ५० हजार रुपयांची दारु जप्त केली आहे.

Parbhani: Vasta caught 50,000 rupees in Vaasa | परभणी : वस्सा येथे ५० हजार रुपयांची दारु पकडली

परभणी : वस्सा येथे ५० हजार रुपयांची दारु पकडली

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी) : जिंतूर तालुक्यातील वस्सा येथे पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात ५० हजार रुपयांची दारु जप्त केली आहे.
वस्सा येथील महादेव मंदिराच्या जवळ बंडू नारायण राऊत यांचे निवासस्थान आहे. १३ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. तेव्हा इंपेरियल ब्ल्यू कंपनीच्या १०० बाटल्यांचे एक पोते, ९२ बाटल्यांचे आणखी एक पोते मिळून आले. या दारुची किंमत २६ हजार ८८० रुपये एवढी आहे. तसेच ६ हजार २४० रुपयांची मास्टर ब्लॅडर कंपनीची दारु, ४ हजार ५०० रुपयांच्या मॅकडॉल नंबर १ या दारुच्या ३० बाटल्या, २ हजार ५८० रुपयांच्या बिअरच्या १८ बाटल्या, तसेच ८ हजार १९४ रुपयांची वेगवेगळ्या कंपनीची देशी व विदेशी दारुही पोलिसांनी जप्त केली आहे.
या कारवाईत एकूण ४८ हजार ३९४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीस बोरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Parbhani: Vasta caught 50,000 rupees in Vaasa