परभणी : टेम्पोला वाचविताना टिप्पर चढला दुभाजकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:56 IST2019-02-04T00:55:40+5:302019-02-04T00:56:18+5:30
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सोनपेठ फाटा ते पोखर्णी फाट्यापर्यंत टाकण्यात आलेल्या दुभाजकांमध्ये आऊटसोर्स नसल्याने शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विरुद्ध दिशेने होत आहे. याचा फटका वाहनधारकांना बसत असून अपघातांमध्ये वाढ झाली आहे. ३ फेब्रुवारी रोजी विरुद्ध दिशेने येणाºया टेंपोला चुकविताना टिप्पर दुभाजकावर चढल्याची घटना घडली.

परभणी : टेम्पोला वाचविताना टिप्पर चढला दुभाजकावर
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सोनपेठ फाटा ते पोखर्णी फाट्यापर्यंत टाकण्यात आलेल्या दुभाजकांमध्ये आऊटसोर्स नसल्याने शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विरुद्ध दिशेने होत आहे. याचा फटका वाहनधारकांना बसत असून अपघातांमध्ये वाढ झाली आहे. ३ फेब्रुवारी रोजी विरुद्ध दिशेने येणाºया टेंपोला चुकविताना टिप्पर दुभाजकावर चढल्याची घटना घडली.
राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पाथरी शहरातून जाणाºया या रस्त्यावर दुभाजक बसविण्यात आले आहेत. शहरात सोनपेठ पॉईंट, मोंढा परिसरात तसेच सेंट्रल नाका, बसस्थानक आणि सेलू कॉर्नर या ठिकाणी रस्त्यावर आऊटसोर्स सोडण्यात आले आहेत. बाहेरील व शहरातील रहदारी पूर्णत: याच रस्त्यावर अवलंबून आहे.
या रस्त्यावरून येणाºया -जाणाºया दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अनेक वेळा विरुद्ध दिशेने प्रवास करावा लागतो. यामुळे अपघाताचे प्रमाण आहे वाढले आहे. दुभाजकावर लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. या जाळ्या कापून काही ठिकाणी रस्ताही तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर दूर दूर यू-टर्न असल्याने वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहने घेऊन जात असल्याने अपघात वाढले आहेत.
३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास माजलगावकडून एम.एच. २३-६७२७ हा टिप्पर पाथरी शहरात येत होता. दरम्यान, याच वेळी मोंढा परिसरात विरुद्ध दिशेने वेगाने दुसरा टेंम्पो एम.एच. २०-९३३७ हा येत होता.
समोरच्या टेम्पोला चुकविण्याच्या प्रयत्नात टिप्पर थेट दुभाजकावर चढला. यामुळे दुभाजकाच्या लोखंडी सळया तुटून पडल्या.
या घटनेनंतर चालक टेम्पोसह पसार झाल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक आवेज काझी यांनी दिली. घटनेनंतर जखमी टिप्पर चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वळण रस्ते तयार करा
४पाथरी शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. शहर परिसरात या मार्गावर दुभाजकही टाकण्यात आले आहेत; परंतु, वाहनधारकांना वळण घेण्यासाठी मोठे अंतर कापावे लागत आहे. त्यामुळे बहुतांश वाहनधारक हे विरुद्ध दिशेने वाहन चालविण्यातच धन्यता मानत आहेत. परिणामी दररोज छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन टाकण्यात आलेल्या दुभाजकामधून ठिकठिकाणी वळण रस्ते तयार करुन द्यावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.