आरोपींना मदत करणे भोवले; पोलीस कर्मचारी सेवेतून बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 11:48 IST2020-06-25T11:46:48+5:302020-06-25T11:48:24+5:30
अधीक्षकांनी सेवेतून केले बडतर्फ

आरोपींना मदत करणे भोवले; पोलीस कर्मचारी सेवेतून बडतर्फ
परभणी : अवैध धंदे करणाऱ्या आरोपींना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मदत करणे पोलीस कर्मचाऱ्याला चांगलेच भोवले असून पोलीस अधीक्षकांनी त्यास शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात जिंतूर पोलिसांनी कारवाई करून अवैध विक्री होणारी दारू पकडली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना हनुमंत कछवे यांनी आरोपींना मदत केल्याचे तपासात पुढे आले. त्यावरून सहायक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कछवे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, याच प्रकरणात सहायक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कछवे यांना शासकीय सेवेतून बडतर्फ केल्याचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी काढले आहेत.