शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

परभणी : २४ गावांसाठी मागविले ३० लाखांचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 23:37 IST

२०१८ च्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी अनुदानाचे वाटप अजूनही पूर्ण झालेले नाही. दोन तालुक्यांतील २४ गावांसाठी तहसीलदारांनी आगाऊची २९ लाख ९९ हजार रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडे नोंदविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २०१८ च्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी अनुदानाचे वाटप अजूनही पूर्ण झालेले नाही. दोन तालुक्यांतील २४ गावांसाठी तहसीलदारांनी आगाऊची २९ लाख ९९ हजार रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडे नोंदविली आहे.२०१८ मध्ये जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. अनियमित आणि अल्प पावसामुळे खरिपाचे उत्पादन हाती लागले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. शेतकºयांवर ओढवलेले हे संकट काही प्रमाणात दूर करण्यासाठी राज्य शासनाने खरीप हंगामामध्ये बाधित झालेल्या पिकांसाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपये प्रति हॅक्टरी याप्रमाणे मदत देऊ केली होती. दोन टप्प्यांमध्ये ही मदत शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन महसूल प्रशासनाने केले. मात्र २०१९ मधील खरीप हंगाम ओसरत आला तरीही मागील वर्षांच्या दुष्काळी अनुदानाचे वाटप अद्यापही पूर्ण झाले नसल्याची परिस्थिती दिसत आहे.मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. पावसाळ्याचे अडीच महिने उलटले; मात्र समाधानकारक पाऊस झाला नाही. खरीप हंगामातील पिके पावसाअभावी कोमेजण्याच्या अवस्थेत आहेत. पीक कर्जही वेळेवर मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी यावषीर्ही आर्थिक पेचात आहे. असे असताना किमान मागील वषीर्चे दुष्काळी अनुदान तरी सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा होती. मात्र परभणी आणि मानवत या दोन तालुक्यात दुसºया टप्प्यातील अनुदान अद्यापही शेतकºयांपर्यंत पोहोचले नाही.परभणी तालुक्यातील २२ गावांतील शेतकºयांना अनुदानाचे वाटप करण्यासाठी प्रशासनाला २८ लाख ५९ हजार रुपयांची रक्कम कमी पडली आहे. त्यामुळे तहसील प्रशासनाने आता कुठे जिल्हाधिकाºयांकडे अनुदानापोटी रक्कम देण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे मानवत तालुक्यातील दोन गावांसाठी १ लाख ४० हजार ९९६ रुपयांची रक्कम कमी पडली असून, या रकमेची मागणी जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे.एकंदर दोन्ही तालुक्यांमध्ये दुष्काळी अनुदानाचे वाटप रखडले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून २९ लाख ९९ हजार रुपयांचा निधी दोन्ही तालुका प्रशासनाकडे वर्ग झाल्यानंतर उर्वरित शेतकºयांना दुष्काळी अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होईल.२०२ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यावर४दुष्काळी भागातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून मिळालेल्या मदतीपैकी २०२ कोटी १९ लाख ५३ हजार २३२ रुपये आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.४त्यात परभणी तालुक्यात ५५ कोटी ७९ लाख ५५ हजार ७५५ रुपये, पालम तालुक्यात २८ कोटी ६० लाख ४१ हजार ८३० रुपये, पाथरी तालुक्यात २९ कोटी ५९ लाख ४६ हजार २८३ रुपये, मानवत तालुक्यात २६ कोटी ८० लाख ६ हजार ६९४ रुपये, सोनपेठ तालुक्यात २० कोटी ९० लाख ३४ हजार २०४ रुपये.४सेलू तालुक्यात सर्वाधिक ४० कोटी ४९ लाख ६८ हजार ४६६ रुपयांची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यावर जमा झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.समर्पण निधीतूनच दिली जाणार रक्कम४जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकºयांना मदतीचे वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी परभणी आणि मानवत तहसीलदारांनी नोंदविली आहे.४ जिल्हा प्रशासनाकडे यापूर्वीच १ कोटी १ लाख रुपये समर्पित झाले असून, या निधीतूनच दोन्ही तालुक्यांना मागणीप्रमाणे निधी दिला जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली.या गावांसाठी मागविला निधी४परभणी तालुक्यातील सुरपिंपरी, बोरवंड बु., देवठाणा, साबा, असोला दुरडी, मुरुंबा, मिरखेल, वरपूड, आंबे टाकळी, ब्राह्मणगाव, कौडगाव, पारवा, परभणी, आर्वी, गोविंदपूर, पिंगळी, शेंद्रा, नांदखेडा, तट्टुजवळा, वांगी आणि मांडवा या गावासांठी जिल्हा प्रशासनाने निधी मागविला आहे.एक कोटी रुपयांचा निधी समर्पित४दुष्काळग्रस्त भागातील शेतकºयांना वितरित करण्यासाठी प्राप्त झालेल्या अनुदाना पैकी काही रक्कम शिल्लक राहिल्याने चार तालुक्यातील तहसीलदारांनी सुमारे १ कोटी १ लाख १७ हजार ३४६ रुपयांचा निधी जिल्हाधिकाºयांकडे समर्पित केला आहे.४त्यामध्ये पाथरी तालुक्याने ९० लाख रुपये, मानवत तालुक्याने १ हजार ३१३ रुपये, सोनपेठ तालुक्यातून ६ लाख ४ हजार १८२ रुपये आणि सेलू तालुक्याने ११ लाख १६ हजार ३३ रुपये जिल्हा प्रशासनाकडे समर्पित केले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळFarmerशेतकरीGovernmentसरकार