परभणी : पडेगाव, रत्नापूर येथे बसवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:16 AM2018-07-23T00:16:18+5:302018-07-23T00:17:02+5:30

तालुक्यातील पडेगाव पाटीजवळ जिंतूर आगाराच्या लातूर-जिंतूर (बस क्रमांक एमएच १४ बीटी-२१९२) या बसवर दगडफेक केल्याची घटना २१ जुलै रोजी रात्री १०़१५ च्या सुमारास घडली़

Parbhani: A stone throwing stone at Padgaon, Ratnapur | परभणी : पडेगाव, रत्नापूर येथे बसवर दगडफेक

परभणी : पडेगाव, रत्नापूर येथे बसवर दगडफेक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : तालुक्यातील पडेगाव पाटीजवळ जिंतूर आगाराच्या लातूर-जिंतूर (बस क्रमांक एमएच १४ बीटी-२१९२) या बसवर दगडफेक केल्याची घटना २१ जुलै रोजी रात्री १०़१५ च्या सुमारास घडली़
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमधील प्रवासी परळी नाका येथे उतरून बस पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहे़ यामध्ये बसचे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे़ या प्रकरणी चालक किशन मानकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चौघांविरूद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, पोलीस शिपाई संदीप पांचाळ तपास करीत आहेत़
रत्नापूर येथे बसवर दगडफेक
तालुक्यातील रत्नापूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील प्रस्तावित टोल नाक्याजवळ रविवारी सकाळी ११़२० च्या सुमारास पाथरी आगाराच्या परभणी-पाथरी या बसवर चार अज्ञातांनी दगडफेक केली़ यामध्ये बसचे समोरील व पाठीमागील काच गजाने फोडण्यात आले. तर दोन्ही बाजूंच्या खिडक्यांवर दगडफेक करून आठ खिडक्या फोडल्या़ यामध्ये एसटीचे ५० हजारांचे नुकसान झाले़ या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे़
परभणी जिल्ह्यात गुरुवारपासून महामंडळाच्या बसेसवर दगडफेक करण्याच्या घटना होत आहेत़ परभणी, गंगाखेड, पाथरी, मानवत, सोनपेठ इ. भागांत या घटना घडल्या़ आतापर्यंत जिल्ह्यात १६ बसवर दगडफेक केल्याने बसचे नुकसान झाले आहे़ महामंडळ प्रशासनाने या संदर्भात ठिक ठिकाणी अज्ञातांविरूद्ध गुन्हे नोंदविले आहेत़

Web Title: Parbhani: A stone throwing stone at Padgaon, Ratnapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.