शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

परभणी: नांदेड-औरंगाबाद डेमो रेल्वेगाडी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:10 PM

नांदेड ते औरंगाबाद या मार्गावर वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेऊन डेमो रेल्वेगाडी सुरू करावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नांदेड ते औरंगाबाद या मार्गावर वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेऊन डेमो रेल्वेगाडी सुरू करावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे़नांदेड ते औरंगाबाद या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी आहेत़ या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये उभे राहून प्रवासी प्रवास करतात़ विशेष म्हणजे दक्षिण-मध्य रेल्वे विभागाकडे नांदेड विभागासाठी एक डेमो रेल्वे गाडी पडून आहे; परंतु, ही गाडी अद्याप सुरू होत नाही़ आंध्र प्रदेशमध्ये सद्यस्थितीत २२ ते २५ डेमो रेल्वे गाड्या चालविल्या जातात; परंतु, नांदेड विभागात केवळ एकमेव डेमो रेल्वे सुरू आहे़ नांदेड-औरंगाबाद, औरंगाबाद-अकोला, औरंगाबाद-उस्मानाबाद, अकोला-उस्मानाबाद या मार्गावर डेमो लोकल रेल्वेची मागणी असतानाही दक्षिण-मध्य रेल्वे विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे़ त्यामुळे मराठवाडा भागातील प्रवाशांना हक्काच्या सुविधेपासून वंचित ठेवले जात आहे़ तसेच दरवर्षी मुंबईला जोडून १५ ते २० नवीन गाड्या सुरू होत असताना नांदेड आणि अकोला येथून मुंबईसाठी नवीन गाड्या मिळत नाहीत़ तसेच उन्हाळ्यातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन औरंगाबादमार्गे नांदेड, मुंबई, लातूर मुंबई, नांदेड-पुणे, नांदेड-बिकानेर, नांदेड-कटरा, औरंगाबाद-नागपूर, सोलापूर-नागपूर या नवीन विशेष गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे़ निवेदनावर प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा़ सुरेश नाईकवाडे, डॉ़ राजगोपाल कालानी, रितेश जैन, रविंद्र मुथा, दिलीपराव दुधाटे, डॉ़ अटल पुरुषोत्तम, कदीरलाला हाश्मी आदींची नावे आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वेAurangabadऔरंगाबादNandedनांदेड