परभणी : ग्रामस्थांचे एकजुटीने श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:11 IST2019-04-25T00:11:31+5:302019-04-25T00:11:48+5:30
तालुक्यातील पाणी पातळी खालावल्याने व हिरवे रान वाळवंटासारखे होऊ लागल्याने गाव पाणीदार करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेत गावागावांतील ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदानाच्या कामात सक्रिय सहभाग नोंदविला असून, सर्वत्र तुफान आल्याचे दिसत आहे.

परभणी : ग्रामस्थांचे एकजुटीने श्रमदान
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी):तालुक्यातील पाणी पातळी खालावल्याने व हिरवे रान वाळवंटासारखे होऊ लागल्याने गाव पाणीदार करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेत गावागावांतील ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदानाच्या कामात सक्रिय सहभाग नोंदविला असून, सर्वत्र तुफान आल्याचे दिसत आहे.
मागील काही वर्षांपासून तालुक्यात दरवर्षी अत्यल्प पर्जन्यमान होत आहे़ यामुळे सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे़ या परिस्थितीवर मात करून तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी तालुक्यातील विविध गावांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवित एकजुटीने श्रमदानाच्या कामाला सुरुवात केली आहे.
यामध्ये आरबुजवाडी, खादगाव, हरंगुळ, मरडसगाव, मालेवाडी, सुप्पा खालसा, सुप्पा जहागीर, डोंगरजवळा, गुंजेगाव, बडवणी, घटांग्रा आदी गावातील ग्रामस्थांनी पाणी फाउंडेशनमार्फत राबविल्या जाणाऱ्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेत पावसाचा पाण्याचा थेंबन थेंब गावाच्या शिवारात अडवून जिरविण्यासाठी श्रमदानाच्या माध्यमातून सीसीटी, डीप सीसीटी खोदकाम, शेतातील बांध बंदिस्तीची कामे, वृक्ष लागवड करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
तालुक्यातील अरबुजवाडी गावातील तरुण मंडळीसह अबालवृद्ध व महिला मोठ्या प्रमाणात श्रमदानाच्या कामात सक्रिय झाले असून, या कामासाठी लागणाºया जेसीबी मशीनच्या डिझेल खचार्साठी ग्रामस्थच लोकवर्गणी जमा करीत आहेत. येणाºया काळात हे गाव पाणीदार होईल, असा आशावादही व्यक्त केला जात आहे. ४५ दिवसांत गाव शिवारात श्रमदान करून पावसाचे पाणी पुढे वाहून जाऊ न देण्याचा संकल्पही ग्रामस्थ बोलून दाखवित आहेत.
पावसाचे पाणी अडवून गाव परिसरात जिरवून गावाला पाणीदार करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला. या गावांतील महिला, पुरुषांसह सर्वच जण श्रमदानासाठी सरसावले असल्याचे दिसून येत आहे.