शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

परभणी : पूर्णेवरील पाणीटंचाईचे संकट अखेर टळले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 23:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पूर्णा  ( परभणी ) : बारा दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून पूर्णा कोल्हापुरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा  (परभणी) : बारा दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून पूर्णा कोल्हापुरी बंधाऱ्यात २७ डिसेंबर रोजी पाणी धडकणार असल्याची माहिती नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांनी दिली.पूर्णा नदीपात्रात कोल्हापुरी बंधाºयात अडविलेले पाणी शहरासाठी वापरले जाते. एकदा बंधारा पूर्ण भरल्यानंतर चार महिने शहराला पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे; परंतु, नादुरुस्त दरवाजे व बंधाºयाच्या तळभागातून होणाºया पाणी गळतीमुळे पाण्याचा मोठा अपव्यय होतो. यामुळे चार महिने पुरणारे पाणी हे दोन ते अडीच महिन्यातच संपते. बंधाºयात पाणीसाठा शिल्लक नसल्याने ऐन हिवाळ्यात शहरात बारा दिवसांपासून नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा खंडित झाला होता. बंधाºयात पाणी नसल्याने शहरातील खाजगी व सार्वजनिक हातपंपांनी तळ गाठला आहे. पाणीपातळी खोलवर गेल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे पाणी रोटेशन तसेच नादुरुस्त बंधाºयाचे दरवाजे बदलून नवीन दरवाजे टाकण्याबाबत मागणी केल्यानंतर २३ डिसेंबर रोजी सिद्धेश्वर धरणातून परभणी व पूर्णा शहरासाठी पाणी सोडण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळपर्यत पूर्णा कोल्हापुरी बंधाºयात ०.५ दलघमी पाणी सोडण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बारा दिवसांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरवासियांना पाणी मिळणार आहे.बहुतांश हातपंप पडले बंद४पाणीटंचाईच्या काळात पर्याय म्हणून पालिकेद्वारे प्रत्येक प्रभागात हातपंपांची व्यवस्था करण्यात आली आहे; परंतु, अनेक हातपंप पाणी नसल्याने कोरडे पडले आहेत. तर बहुतांश हातपंप दुरुस्तीअभावी बंद आहेत. बंद पडलेले हातपंप दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.बंधारा दुरुस्त करण्याची मागणी४पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधारा हा पूर्णपणे नादुरुस्त आहे. या बंधाºयाच्या तळ भागातून व दरवाजातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते.४याबाबत पालिका प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा केला जातो; परंतु, संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ऐन दुष्काळात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे.४पूर्णा येथील बंधाºयाची दुरुस्ती केली तर दुष्काळात पाण्याचा अपव्यय थांबविणे शक्य होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईDamधरण