परभणी : पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:23 IST2018-11-04T00:23:19+5:302018-11-04T00:23:19+5:30
पुणे येथील भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावा, या मागणीसाठी सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीच्या चार कार्यकर्त्यांनी परभणीत पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले़ पहाटे ४़३० वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाची धावपळ झाली़ सकाळी ११ वाजेच्या सुमारास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले़

परभणी : पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पुणे येथील भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावा, या मागणीसाठी सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीच्या चार कार्यकर्त्यांनी परभणीत पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले़ पहाटे ४़३० वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाची धावपळ झाली़ सकाळी ११ वाजेच्या सुमारास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले़
महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात देशातील पहिली शाळा सुरू केली़ हा वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावा, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून केली जात आहे़ मात्र त्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे़
वारंवार मागणी करूनही स्मारक घोषित करण्यासाठी विलंब केला जात असल्याने शनिवारी पहाटे ४़३० वाजेच्या सुमारास कल्याण जाधव, किशन गाडेकर, अरुण हरकळ, विकास लवट या युवकांनी खाजा कॉलनी येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले़ कार्यकर्त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे दिवसभर हे आंदोलन चर्चेचा विषय ठरले होते़
दरम्यान, सकाळी ११ वाजेच्या सुमारास उपजिल्हाधिकारी महादेव किरवले आणि तहसील प्रशासनाच्या अधिकाºयांनी आंदोलकांची भेट घेऊन या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले़ त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़ यावेळी नागरिकांची गर्दी होती.
चारही आंदोलकांवर गुन्हा दाखल
४पुणे येथील भिडेवाडा येथे महात्मा फुले यांचे राष्टÑीय स्मारक घोषित करावे, या मागणीसाठी परभणीतील खाजा कॉलनीतील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणाºया चारही आंदोलकांविरुद्ध नवामोंढा पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.
४महापालिकेचे व्हॉल्वमन मनोहर लक्ष्मण गवारे यांनी फिर्याद दिली. त्यावरून कल्याण कोंडीभाऊ जाधव (औरंगाबाद), अरूण जनार्दन हरकळ (तांदूळवाडी), विकास शिवाजीराव लवट (मांडाखळी), किसन आसाराम गाडेकर (परतूर) या चौघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. जमादार व्ही.बी. पिंपळे तपास करीत आहेत.