परभणी: गंगाखेडमध्ये पकडली साडेसात हजारांची दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:40 IST2019-04-12T23:39:30+5:302019-04-12T23:40:08+5:30
गंगाखेड शहरातील लहुजीनगरात पोलिसांनी छापा टाकून साडेसात हजार रुपयांची दारू पकडली आहे. गुरुवारी रात्री १०.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.

परभणी: गंगाखेडमध्ये पकडली साडेसात हजारांची दारू
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गंगाखेड शहरातील लहुजीनगरात पोलिसांनी छापा टाकून साडेसात हजार रुपयांची दारू पकडली आहे. गुरुवारी रात्री १०.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.
अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास फिरत असताना अवैध दारूच्या साठ्याची माहिती पथकाला मिळाली. त्याअधारे लुहजीनगरातील संजीवनी लक्ष्मण गायकवाड यांच्या घराची झडती पोलिसांनी घेतली. त्यावेळी देशी दारूचे ३ बॉक्स पोलिसांना आढळून आले.
या प्रकरणी संजीवनी गायकवाड हिच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी डोंगरे, मुंढे, चव्हाण, मोबीन यांनी ही कारवाई केली.